लोहमार्ग मुबंई पोलीस आयुक्तालयाच्यावतीने व कलर्स मराठी वाहिनी यांच्या सयुंक्त विद्यमाने लोहमार्ग मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस अधिकारीकर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी उत्सव २०१९  हा कार्यक्रम आयोजित केला होतो जो प्रेक्षकांना १७ मार्च संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर बघायला मिळणार आहे.  तेंव्हा नक्की बघा उत्सव पोलिसांच्या कौतुकाचा कलर्स मराठीवर. मुंबापुरीच्या रक्षणासाठी नेहेमीच पोलीस विभाग सदैव सतर्क असतोमग ते लोहमार्ग पोलीस असो वा अन्य विभाग. कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन चोखरीत्या पार पाडले जात आहे कि नाही याच्यावर त्यांचे कटाक्षाने नियंत्रण असते. याच आपल्या लोहमार्ग मुंबई पोलीसांच्या सन्मानाखातर आणि हे सगळे पोलीस अधिकारी आपल्यासाठी करत असलेल्या मौल्यवान कार्यासाठी कलर्स मराठीने त्यांना एक मानवंदना देण्यासाठी वा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी “उत्सव २०१९” या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. याचबरोबर श्री. जयजित सिंग अपर पोलीस महासचालकलोहमार्गपरिक्षेत्र,महाराष्ट्र राज्यमुंबई, श्री.विवेक फणसळकर पोलीस आयुक्तठाणे शहरश्री.संजय बर्वे पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागमहाराष्ट्र राज्यमुंबईश्री. हेमंत नगराळेअपर पोलीस महासंचालक,श्री. नवल बजाजविशेष पोलीस महानिरीक्षकठाणे परीक्षेत्रश्रीमती कुंदन अतिरिक्त  आयुक्त बृहन्मुंबई महानगर पालिकाश्रीप्रकाश मेहता गृहनिर्माण मंत्रीमहाराष्ट्र राज्यश्री.आशिष शेलार शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी असे अनेक मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर आपल्या सगळ्यांची लाडकी सोनाली कुलकर्णीस्वप्नील जोशीराहुल वैद्य,सेलिना जेटली यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मृण्मयी देशपांडे आणि प्रियदर्शन जाधव यांनी केले. कार्यक्रमामध्ये मानसी नाईकस्मिता गोंदकर आणि बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडे यांनी लावणी तसेच पिंगा या गाण्यावर मेघा धाडे आणि सई लोकूर देखील एकत्र नृत्य सादर केले. तसेच पुष्कर जोग आणि सई लोकूर यांनी अप्रतिम नृत्य सादर केले. तसेच वैशाली माडेआनंद शिंदेराहुल वैद्य यांनी बहारदार गाणी सादर केली. राहुल वैद्य याच्या अप्रतिम गाण्यांनी कार्यक्रमाला रंगत आणली. भूषण कडूनंदकिशोर चौघुलेमाधवी जुयेकर यांच्या विनोदाने जमलेल्या सगळ्यांना पोट धरून हसण्यास भाग पाडले तर वैशाली माडे हिच्या गाण्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली. 

हा कार्यक्रम प्रेक्षकांना कलर्स मराठीवर १७ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता बघायला मिळणार आहे. तेंव्हा नक्की बघा “उत्सव २०१९-” फक्त कलर्स मराठीवर.