मनोरंजन क्षेत्रात फेमस असलेल्या सुपरस्टार अभिनेते अभिनेत्री यांच्या आयुष्यात, घरात नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याची तुम्हाला आम्हाला चाहत्यांना फार उत्सुकता असते. कारण त्यांचं लाईफ आपल्यापेक्षा काहीसं वेगळं असेल असं वाटत असतं.
तर आपल्याला बरयापैकी जे सेलिब्रिटी लोक आवडतात त्यांच्या बाबतीत गोष्टी माहीत असतात. पण काही गोष्टी अश्या असतात की त्या खूप आतल्या असतात. त्या सहजपणे कळत नाहीत. त्याच गोष्टी आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
शाहरूख खान या सेलिब्रिटीला कुणी ओळखत नसलेला या जगात कुणी नसेल ही. तर सुपरस्टार च्या मुंबई मधील मनत च्या घरी आपल्याला माहितेय कुणाचं चालतं ? गौरी खान नाहीतर या व्यक्तीचं. चला मग जाणून घेऊ सविस्तर.
अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावरून गायब आहे. पण किंगखानचा दबदबा अद्यापही कायम आहे. याचमुळे किंगखानच नाही तर त्याची अख्खी फॅमिली या ना त्या कारणाने चर्चेत असते. किंगखानची पत्नी गौरी खान (Gauri Kkhan) हिचीची इंडस्ट्रीत एक मोठी ओळख आहे. इंडस्ट्रीतील नामवंत इंटिरिअर डिझाईनर म्हणून ती ओळखली जाते. एकंदर काय तर शाहरूख व गौरी दोघेही आपआपल्या फिल्ममध्ये टॉप प्लेअर आहे.
पण ‘मन्नत’च्या आत चित्र जरा वेगळे आहे. होय, भलेही एसआरके बॉलिवूडचा बादशाह असेन, पण ‘मन्नत’मध्ये (Mannat) मात्र त्याच्या सासूबाईंचा हुकूम चालतो. होय, किंगखान काय आणि गौरी काय, दोघेही तिच्यापुढे ब्र सुद्धा काढत नाहीत. कारण दरारा तेवढा आहे. कामाची पध्दत खूप स्ट्रिक आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज होतात.
होय, वाचून जरा आश्चर्य वाटेल पण, शाहरूख आणि गौरी यांच्या घराची अख्खी जबाबदारी गौरीची आई सविता चिब्बर (Savita Chibber) सांभाळतात. खुद्द गौरीने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. गौरीची आई दिल्लीत राहते. पण दिल्लीतून त्या सगळा कारभार बघतात.
गौरी आणि शाहरुख दोघेही आपापल्या कामानिमित्त फारच व्यस्त असतात. त्यांना घराकडे जास्त वेळ देता येत नाही. अशात घरातील प्रत्येक कामावर सविता बारकाईने लक्ष ठेवतात. घरातील सगळ्या स्टाफवर त्यांचा जबरदस्त वचक आहे. त्यांच्याकडून काम काढून घेणे, त्यांना मॅनेज करणे, ही सगळी जबाबदारी त्याच बघतात. त्यामुळे त्या सतत व्हॉट्सअप व फोनवर असतात. मन्नत बंगल्याची सूत्र ही सविता यांच्याच हातात आहेत.
गौरीने स्वत: एका मुलाखतीत ही माहिती दिली होती. ती म्हणाली की, आईमुळे माझा सगळ्यांत मोठा आधार आहे. ती माझ्या घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळते. अगदी दिल्लीत बसून सर्व काही मॅनेज करते. तिच्यामुळे मी आणि शाहरूख दोघेही निश्चिंतपणे आपआपले काम करू शकतो.
वर्किंग वुमनसाठी घर आणि काम दोन्ही सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत असते. या दोन्ही जबाबदाºया पार पाडणे तणावपूर्ण असते. अशावेळी आई किंवा सासू दोघींपैकी एक असतील तर अनेक गोष्टी सोप्या होतात.
तसे सगळीकडे असे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील. पण तरी अश्या उदाहरणातून जाणं म्हणजे कुठं तरी विश्वासाला ठेच पोहचणे रे. अश्याच नवनवीन गोष्टी आम्ही आपल्यासाठी घेऊन येऊ. स्टार मराठी.रहा काळजीवंत. सुरक्षित.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.