मित्रांनो!, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात ते उगीच नाही. लग्नाच्या अवघ्या ८ तास आधी वधू पूर्णपणे अपंग झाली. वर लग्न करण्यात नकार देईल, असा मुलीकडच्यांचा विचार होता. अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे आनंदाच्या घरात शोककळा पसरली आणि मुलीच्या बाजूने वधूच्या धाकट्या बहिणीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. पण मुलाने वधूच्या बाजूने आलेली ही ऑफर नाकारली.

प्रयागराज (उत्तर प्रदेश) प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा भागात राहणारी आरती मौर्य या मुलीचे लग्न जवळच्या खेड्यातील एका अवधेश नावाच्या मुलाशी ठरले. कुटुंबात हास्याचे वातावरण होते. सर्व काही व्यवस्थित चालू होते. दुसऱ्या दिवशी वरातही येणार होती. दोन्ही बाजूचे लोक आनंदात होते. लग्नाचा दिवसही आला आणि सर्व तयारी सुरू झाली. कुटुंबातील सदस्य आणि बाकीचे पाहुणे अन्य तयारी करत होते…

याच वेळी वधूसोबत अपघात झाला. एका मुलाला वाचवण्यासाठी वधू आरती छतावर चढली होती. यावेळी पाय घसरला आणि ती छतावरून पडली. या अपघातात आरतीचा पाठीचा कणा पूर्णपणे निकामी झाला आहे. कंबर व पाय यांच्यासह शरीराच्या इतर अवयवांनाही दुखापत झाली. तिला तत्काळ रुग्णालयात हालवण्यात आले. मात्र आरतीवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी हात वर केले.

त्रासलेल्या आणि घाबरलेल्या आरतीला अखेर उपचारासाठी प्रयागराज येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांचे म्हणणे ऐकताच पायाखालची जमीन सरकलीडॉक्टरांनी सांगितले की, सध्या आरती अपंग झाली आहे आणि ती अनेक महिने अंथरुणावरुन उठू शकत नाही. हे ऐकताच कुटुंबातील सदस्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मुलकजडील मंडळी लग्न मोडतील, अशी आरतीच्या कुटुंबीयांना अपेक्षा होती.

निराश झालेल्या आरतीच्या कुटुंबीयांनी वर अवधेश आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना या संपूर्ण घटनेविषयी माहिती दिली. मुलीने वराच्या कुटुंबीयांना हे संबंध तोडू नका असे सांगितले आणि आरतीऐवजी तिच्या लहान बहिणीशी लग्न करण्याचे सुचवले. पण अवधेशचे उत्तर ऐकून सर्वजण चकित झाले. अवधेश असं काही करेल अशी त्यांना अपेक्षा नव्हती.आरती ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत तिला स्वीकारण्यात तयार असल्याचे अवधेशने सांगितले. हे ऐकून आरतीच्या कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू आले. यानंतर, ऑक्सिजन सपोर्ट सिस्टिमच्या मदतीने उपचार घेत अवधेशने आरतीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्नासाठी आरती २ तास घरी आलीडॉक्टरला विशेष विनंती केल्यानंतर आरतीला दोन तास घरी आणण्यात आले. तिला स्ट्रेचरवर ठेऊन लग्नाचे विधी पार पडले. यावेळी उपस्थितांचे डोळे ओले झाले होते. संपूर्ण रितीरिवाजानुसार आरतीची पाठवणी पार पडली. मात्र ती सासरी न जाता रुग्णालयात ऑपरेशनसाठी गेली. तसेच तिच्या सर्जरीच्या फॉर्मवर अवधेशने पती म्हणून सही केली.

लग्नानंतर अवधेश अजूनही रुग्णालयात आहे. तो प्रत्येक क्षणी आपल्या पत्नीची काळजी घेत आहे. अवधेश आरतीचे सांत्वन करत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आरतीला पुढील अनेक महिने अंथरुणावरच राहावे लागणार आहे. तिला सामान्य जीवन जगण्यासाठी बराच काळ लागणार आहे. आयुष्यातील सर्वात कठीण वेळी अवधेशने जबाबदारी स्वीकारल्याने आरती आनंदी आहे. आजकाल अवधेश आणि आरतीच्या प्रेमाची सर्वत्र चर्चा होत असून अवधेशच्या या निर्णयाचे सर्वजण कौतुक करत आहेत.