‘फॅंड्री’तील जब्याची आयटम शालूचा येतोय नवा सिनेमा

Rajeshwari Kharat Itemgiri Marathi Movie

Movie : Itemgiri (2016)  |आयटमगिरी

‘फॅंड्री’ या सिनेमातून लोकप्रिय झालेली शालू सिनेमानंतर कुठे गायब झाली असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. शालूची भूमिका साकारणारी राजेश्वरी खरात ही पुन्हा पडद्यावर बघायला मिळेल की नाही याचीही उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. ‘फॅन्ड्री’मध्ये शालूला भलेही डायलॉग नव्हते पण पडद्यावरील तिचा वावर अनेकांना सुखावून गेला होता.

Itemgiri Marathi Movie poster Rajeshwari Kharat

जब्या ज्या मुलीसाठी काळ्या चिमणीच्या शोधात वणवण भटकायची ती शालू म्हणजेच राजेश्वरी खरात हिने ‘फॅंड्री’नंतर शिक्षणासाठी चांगलाच मोठा ब्रेक घेतला होता. शालूचं दिसणं अजूनही अनेकांच्या मनात ठसलेलं आहे. त्यामुळे तिच्या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. पण आता राजेश्वरीच्या सिनेमाची वाट बघणा-यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शालू आता लवकरच ‘आयटमगिरी’ असे टायटल असलेल्या सिनेमात बघायला मिळणार आहे.

Itemgiri Marathi Movie

‘आयटमगिरी’ असं धमाकेदार टायटल असलेल्या सिनेमात राजेश्वरी मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. प्रदीप टोनगे दिग्दर्शित या सिनेमाचा टीझर अलीकडेच रिलीज करण्यात आला. या सिनेमात राजेश्वरीसोबत ‘धग’ फेम अभिनेता हंसराज जगताप दिसणार आहे. सोबतच राहुल पुणे हा अभिनेता सुद्धा या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय. सिनेमाचे शूटिंग आता शेवटच्या टप्प्यात आले असून यावर्षी हा सिनेमा रिलीज होणार असल्याचे समजते.

Itemgiri Marathi Movie poster 2

राजेश्वरी खरात मुळची पुण्याची आहे. ‘फँड्री’ या सिनेमाच्या वेळी ती दहाव्या वर्गात शिकत होती. आता राजेश्वरी बी.कॉम फर्स्ट इयरमध्ये आहे. नुकतीच तिने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. ‘फँड्री’नंतर राजेश्वरीने शिक्षणाकडे लक्ष दिले. याचकाळात तिला ‘अॅटमगिरी’ या सिनेमाची ऑफर आली. सध्या तिच्या या सिनेमाचे शेवटच्या टप्प्यातील शूटिंग सुरु आहे.

Jabya Shalu

Itemgiri Marathi Movie poster

Shalu

Fandry Fame Rajeshwari Kharat Playing Lead Role In ‘ Itemgiri ‘