मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवून अनेक दशके मनोरंजन करणारे, आपल्या सर्वांचे आवडते मामा म्हणजेच अशोक सराफ. त्यांचे आजवरचे सर्व चित्रपट प्रचंड गाजलेले आहेत. मामांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना टेन्शन मुक्त केलं. त्यांचा एक असा चित्रपट नाही की तो प्रेक्षकांना आवडला नसेल.
अशोक सराफ हे नाव खूप जेष्ठ आहे इंडस्ट्री मध्ये. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी ला दिलेले आहेत. आज घराघरात अशोक सराफ यांच्या सारखे दिग्गज अभिनेते पोहचलेले आहेत. बरं मराठी त त्यांनी आपल्या अभिनयाने लोकांची मनी जिंकलेली आहेतच; पण यासोबतच बॉलीवूड मध्ये सुद्धा आपल्या नावाचा आणि कामाचा दबदबा केलेला आहे. त्यांनी सलमान, शाहरुख अश्या सुपरस्टार कलाकारांच्या सोबत खूप धमाल अशी कामे केलेली आहेत.
मामांच्या संघर्षाच्या आयुष्याबद्दल अनेकांना फार काही माहिती नसेल तर चला मग जाणून घेऊयात. अशोक सराफ हे मुळचे बेळगाव चे. त्यांनी इंडस्ट्री मध्ये करियर करायचं म्हणून बेळगाव सोडून मुंबई गाठली. आणि १९६९ साली चित्रपट आणि छोट्या पडद्यावर पदार्पण केले. कामे करायला सुरुवात केली. जे मिळेल ती कामे सुरुवातीला केली.
तुम्हाला माहित आहे की नाही ? लोकप्रिय जेष्ठ अभिनेते अशोक सराफ मामानी २५० पेक्षा जास्त मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. एवढे चित्रपट करणारे मराठी मध्ये मोजक्यामधील एक अभिनेते आहेत. त्यांनी केलेल्या २५० चित्रपटामधील त्यातले १०० चित्रपट हे इतके गाजले की अशोक सराफ मराठीचे राजा अभिनेते झाले.
त्यांनी १८ वर्षांचे असताना अभिनय करायला सुरुवात केली. ‘एक डाव भुताचा’, ‘धूम ध’डाका’ आणि ‘गम्मत जम्मत’सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच सोबत बॉलिवूडमध्ये त्यांनी ‘करण-अर्जुन’, ‘येस बॉस’ आणि ‘सिंघम’ सारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या विनोदांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. आज प्रत्येकाला प्रश्न पडला असेल एकेकाळी इंडस्ट्री गाजवणारे अभिनेते अशोक सराफ नेमकं करतायत काय ?
अशोक सराफ हे आता आपल्या कुटुंबां सोबत वेळ घालवत आहेत. २०२० साली रिलीज झालेल्या प्रवास या चित्रपटात त्यांनी एक भूमिका साकरली होती; पण आता त्यांना आपल्या कुटुंबाला वेळ द्यायचा आहे. पत्नी निवेदिता सराफ व मुलगा यांना कौटुंबिक वेळ द्यायचा आहे. आणि त्यांचा हा निर्णय खरच कौतुकास्पद आहे. वयाच्या एका लिमिट नंतर कौटुंबिक सुखी जीवन जगायला हवं. मामांना त्यांच्या व कुटुंबाच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा…
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.