भोजपुरी, दाक्षिणात्य, हिंदी आणि सोबतच नानाविध प्रकारच्या सिनेसृष्टीतून तमाम भारताच्या रसिकप्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे, “रवि किशन.” खरतरं एके काळी या अभिनेत्याच्या लुक्सवरून या अभिनेत्याला त्याचे अनेक चाहते दुसरा मिथुनचं समजत असायचे. रवि किशन एकेकाळी काही सिनेमांमधे मिळेल तसा, मिळेल तो रोल करत आजवर पुढे प्रवास करत राहिला.
आणि सध्याच्या घडीला तो स्वत:च एक निर्माता व त्याचबरोबर राजकारणात भारतीय जनता पार्टीचा खासदारही आहे. रवि किशन या अभिनेत्याने आजवर त्याच्या आयुष्यात अनेक संघर्षांना तोंड दिलं आहे. रवि किशन अनेकदा म्हटला आहे की, “माझ्या संघर्षमय प्रवासात जर मला सर्वाधिक साथ कोणाची लाभली असेल तर ती माझी पत्नी व मुली यांची आहे; असं मी मानतो.”
रवि किशन त्यांचे आभार केवळ शब्दांमधून माडंत नाही तर त्यासाठी तो प्रत्यक्षपणे एक खास गोष्टही करू लागला होता. ही बाब प्रसारमाध्यमांमधे उघडकीस आल्यावर त्यानेच त्या खास गोष्टीवर खुलासा केला होता. रवि किशन हा अभिनेता स्त्रिला भरपूर मानतो. त्याच्या म्हणण्यानुसार तो घरी असेल अथवा कुटुंब सोबत असेल तर हमखास आपल्या मुलीचे आणि पत्नीच्या पाया पडतोच.
भारतीय परंपरेनुसार शक्यतो नवरा कधीच पत्नीच्या पाया पडत नाही, हे भारतीय स्त्रियादेखील कधीच करू देत नाहीत; त्यामुळे रविची पत्नी प्रिती झोपी गेल्यावरच तो तिच्या पाया पडत असायचा. असंही मुलीच्या बाबतीतचं आहे. रवि त्याच्या आयुष्यातल्या अनेक चांगल्या घटनांची नोंद देताना महिलांना विशेष प्राधान्य देताना पहायला मिळतो.
रवि किशनने जेव्हा याबाबत प्रत्यक्ष खुलासा केला होता तेव्हा त्याच्या चाहत्यांना त्याच्याबद्दल मनात प्रचंड आदर निर्माण झाला होता. परंतु अनेक रसिकप्रेक्षकांना त्याच्या अशा वागण्यात थोडीशी विचित्र गोष्ट वाटते. खरतरं तसं पाहता भारतीय स्त्रीला एक विशेष महत्व पुरातन काळापासून लाभलेलं आपण पाहत आलो आहोत. त्यामुळे महिलेचा आदर करत तिच्याबद्दल तो व्यक्त करण्यात काहीच गैर नसलं पाहिजे.
अभिनेता रवि किशन आणि त्याची पत्नी प्रिती दोघांची लव्ह स्टोरी फार जुनी आहे. एकप्रकारे दोघेही त्यांच्या शिक्षणाच्या ११ वीच्या वर्गात असतानाच प्रेमात पडले होते. प्रिती पुढे रविच्या स्ट्रगलिंगच्या दिवसांमधेही खंबीरपणे त्याच्या पाठीशी राहिली होती. रवि तिने दिलेल्या साथीबद्दल कायम एक सद्भावना मनात ठेवतो.
रवि किशन एकुण चार मुलांचा वडिल आहे. त्यात त्याला तीन मुली तर एक मुलगा आहे. आपल्याला तीन मुली आहेत हे रवि कायम गौरवाने इतरांना सांगतो. रवि किशन या अभिनेत्याची मोठी मुलगी रेवा हिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलेलं आहे. “सब कुशल मंगल” या सिनेमातून ती अक्षय खन्ना याच्या विरुद्ध मुख्य भुमिकेत उभी ठाकली होती.
या सिनेमातून तिने अनेक रसिकप्रेक्षकांच्या मनाचा ठाव तर घेतलाच, शिवाय तिने साकारलेल्या पात्राची सर्व सोशल मीडियावर प्रचंड तारीफ देखील झाल्याची पहायला मिळाली. हा सिनेमा म्हणावा तसा हिट जरी गेला नसला तरी रेवाच्या कलेचा सर्व सिनेसृष्टीने अंदाज चांगलाच घेतला. रेवा पुन्हा कोणत्या प्रोजेक्टमधून समोर येणार हे अद्याप समजलं नसलं तरी दुसरीकडे रवि किशन याला आपण कायमचं या ना त्या प्रोजक्टमधून मोठ्या पडद्यावर पाहत राहणार आहोत, यात काहीच शंका नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!