प्रेक्षकांना पसंतीस पडतील अश्या मालिका ‘झी युवा’ ही वाहिनी नेहमीच प्रक्षेपित करत आली आहे . फुलपाखरू, फ्रेशर्स, लव लग्न लोचा, बन मस्का किंवा ‘युवा सिंगर एक नंबर या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या मालिका असोत किंवा साजणा , ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण किंवा प्रेम पॉइझन अथवा युवा डान्सिंग क्वीन’ सारख्या आता सुरु असलेल्या नव्या फ्रेश मालिका असोत प्रेक्षकांनी नेहमीच या सर्व मालिकांचा आनंद घेतला आहे .आता ‘झी युवा’वर लवकरच आणखी एक उत्कृष्ट धमाल विनोदी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नव्या मालिकेचे नाव आहे ” डॉक्टर डॉन ”
या मालिकेचा प्रोमो झी युवा वाहिनीवर दाखवला जात आहे. देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे हे नावाजलेले कलाकार मालिकेमध्ये काम करत आहे . हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. हा टिझर अतिशय मजेशीर असून यात श्वेता शिंदे या एका हॉस्पिटलच्या डीन चा रोल साकारत आहेत प्रोमोची ची सुरुवात श्वेता शिंदेंपासून होते . त्या नर्स ला हॉस्पिटलमधल्या रुग्णांची चौकशी करत एका रुग्णाच्या बेड पाशी येतात तेव्हा त्यांना कळते की तो रुग्ण गोळ्या घेत नाही आहे तेव्हा श्वेता शिंदे सांगतात ‘ घेत नसतील तर जबरदस्ती दे ‘ हे ऐकून अतिशय नखरेल लुक मध्ये आपल्याला देवदत्त नागे हे ऐकताना दिसतो आणि आपल्या बंदुकी मध्ये औषधाची गोळी टाकून ती बंदूक त्या रुग्णाच्या तोंडात टाकतो , हे पाहून श्वेता शिंदे अतिशय चिडते आणि जोरात ओरडते ” देवा ” यावर देवा सांगतो ” जबरदस्तीने का होईना पण औषध पोटात गेलंच पाहिजे ” आणि बंदूक चालवतो आणि औषधाची गोळी त्या रुग्णाच्या पोटात टाकतो . हे पाहून भडकलेली श्वेता बोलते ” देवा सोडणार नाही मी तुला ” आणि या वर तिच्या प्रेमात आखंड बुडालेला देवा आपल्याला कळतो आणि अतिशय प्रेमाने तिला विचारतो ” खरंच ” यावर काय बोलावे हे न कळलेली नाक मुरडत श्वेता शांत होताना दिसते. असा हा मजेशीर प्रोमो सध्या टीव्ही , सोशल मीडिया आणि व्हाट्स ऍप खुपचं गाजतोय .
देवदत्त साकारत असलेली ही भूमिका त्याने आजवर केलेल्या सर्वच भूमिकांपेक्षा वेगळी आहे . त्यात दोघेही उत्तम कलाकार त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत . डॉक्टर डॉन आणि डार्लिंग डीन यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहण्याची संधी प्रेक्षकांना १२ फेब्रुवारीपासून सोमवार ते रविवार रात्री ९ वाजता मिळणार आहे. आता ही नवी जोडी काय धमाल करते ते अनुभवण्यासाठी, बघायला विसरू नका एक हटके मालिका ‘ डॉक्टर डॉन ‘