लठ्ठपणा कमी करण्यासाठी बहुतेक लोक डायटिंगचा अवलंब करतात. बरेच लोक चांगला ब्रेकफास्ट करण्याचा निश्चय धरतात पण रात्रीच्या जेवणाकडे जास्त लक्ष देत नाहीत. बऱ्याच डायटीशियनच्या म्हणण्यानुसार वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणाच्या सवयी बदलणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया या 8 सवयी कोणत्या आहेत.

एक प्लॅन बनवा : सर्वात उत्तम सवय लावायची ती म्हणजे आपण रात्रीच्या वेळी जेवणाचा एक प्लॅन बनवायचा आहे. प्लॅन बनवल्यामुळे तुम्ही फास्ट फूड सारख्या अ’पा’यकारक वस्तू खाण्यापासून तुम्ही स्वतःला दूर ठेऊ शकाल. आपल्या रात्रीच्या जेवणामध्ये प्रथिने, हेल्दी फैट आणि चांगले स्टार्चयुक्त पदार्थ समाविष्ट करा.

घरी नेहमी खाण्यायोग्य पदार्थच ठेवा : आठवड्यानुसार सर्व निरोगी गोष्टी घरी आणा. यामुळे आपल्याला केव्हा काय खायचे आहे याची आठवण राहील. जर आपल्याला वेळेवर योग्य वस्तू मिळाल्या नाहीत तर आपण पोट भरण्यासाठी काहीही खातो. जर आपण घरात खाण्यायोग्य गोष्टी अगोदर ठेवल्या तर आपण हा’नि’का’र’क पदार्थ खाणे टाळाल व आपले वजन नियंत्रित होईल.

रात्रीच्या जेवणापूर्वी ताबडतोब काहीही खाऊ नका : दुपारच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये बराच वेळ असतो. आपण दिवस भर काम करतो त्यामुळे थकवा येतो व भूक लागते. काही लोक संध्याकाळी इतके अनावश्यक पदार्थ खातात की रात्रीच्या जेवणाच्या वेळी थोडी पण भूक राहत नाही व जेवण अपुरे होते. दुपारच्या वेळी फळे, शेंगदाणे किंवा दही खाण्याची सवय लावा.

आपल्याला जे आवडते ते खा : पातळ होण्यासाठी खाण्या बाबत तडजोड अजिबात करू नका. आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टी खाऊ नका. पण रात्रीच्या जेवताना जे आवडेल ते खा. उदाहरणार्थ, जर आपल्याला बटाटा आणि लोणी आवडत असेल तर जेवताना ते खा, फक्त अन्नाचे प्रमाण कमी ठेवा.

कुटुंबासोबत जेवण करा : आपल्या कुटुंबास आपल्या रात्रीच्या जेवणाच्या प्लॅन मध्ये सामील करा. आठवडाभरच्या मेनूचे नियोजन करताना घरातील सदस्यांचे मत घ्या. सर्वानी एकत्र जेवायला बस त्यामुळे कुटुंबामध्ये एकोपा वाढेल व सर्वांच्या जेवणाच्या वेळा देखील एकच होतील.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.