Dhyanimani (2017) Marathi MovieDhyanimani Marathi Movie Review

  • Movie : Dhyanimani (2017) | ध्यानीमनी
  • Director :  Chandrakant Kulkarni
  • Producer : Aniruddha Deshpande & Medha Manjrekar
  • Studio : Great Maratha Entertainment
  • Star Cast :Mahesh Manjrekar,Ashvini Bhave,Abhijeet Khandekar as Sameer,Mrunmayee Deshpande

काही चित्रपट चोरपावलांनी येतात आणि ठसा उमटवून जातात….फक्त तिकिटबारीवरच नाही, तर मनावर सुद्धा! चित्रपट हे असे माध्यम आहे जिथे अलीकडच्या काळात चित्रपटांच्या कथांचे विषयच नाही तर त्यांच्या प्रसारपद्धती देखील बदलत चाललेल्या दिसून येतात. नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण असलेल्या कथा घेऊन येणारे महेश मांजरेकर Mahesh Manjrekar यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे आणि ज्यांच्या दिग्दर्शनाने मराठी सिनेसृष्टीची वेगळी उंची गाठली आहे असे चंद्रकांत कुलकर्णी, यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

अलीकडच्या काळात बॉलिवूडचे कलाकार देखील मराठी कथेकडे विशेष लक्ष देऊन आहे. या सिनेमाच्या प्रसारादरम्यान तुम्हाला ते दिसून आले असेलच. २०१७ च्या सुरवातीला महेश मांजरेकर Mahesh Manjrekar या सिनेमाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा एका वेगळ्या धाटणीचा सिनेमा घेऊन आले आहेत.

Dhyanimani 2017 Marathi Movie Mp3 & Video

Dhyanimani Marathi Movie Songs Free Download

‘ध्यानीमनी’ हा मानसिक जीवनातील रहस्य उलगडणारा सिनेमा आहे. महेश मांजरेकर (सदानंद पाठक) आणि अश्विनी भावे Ashwini Bhave (शालू पाठक) हे दोघेही मुंबईपासून लांब असलेल्या रोहा याठिकाणी आपल्या सुखी कुटूंबात नांदत असतात. महेश मांजरेकर, अश्विनी भावे आणि त्यांचा मुलगा (मोहित) हे तिघेही आपलं आयुष्य जगत असतात. त्यादरम्यान मुंबईहून काही पाहुणे म्हणजे अभिजीत खांडकेकर Abhijit Khandkekar (समिर करंदीकर) आणि मृण्मयी देशपांडे Mrunmayi Deshpande (अपर्णा करंदीकर) हे दांपत्य सुट्टीसाठी म्हणून फिरायला जातात. एखाद्या पाहुण्यांकडे गेलं की त्याच्या मुलांसाठी आपण काहीतरी घेऊन जातो तसंच काहीतरी अभिजीत आणि मृण्मयी घेऊन गेले. शाळेच्या ट्रिपला गेलेला मोहित रात्री उशिरापर्यंत घरी येत नाही, त्यावेळी मायेच्या ओघाने कावरीबावरी झालेली अश्विनी भावे Ashwini Bhave मृण्मयीला बघवत नाही. शोधायला गेलेले वडील म्हणजे महेश मांजरेकर Mahesh Manjrekar घरी परततात आणि काही वेळानंतर घडणारा प्रसंग हा फारच भयानक रहस्य उघडकिस आणतो. त्या भयानक कृत्यामुळे आभिजीत आणि मृण्मयी घाबरून जातात. नक्की मोहित कोण? तो हयात आहे की नाही? अश्विनी भावे Ashwini Bhave अशी का वागते? असे बरेच प्रश्न मनात घर करू पाहतात. अभिजीत खांडकेकर Abhijit Khandkekar मानसोपचारतन्ज्ञ असल्यामुळे तो त्याच्या पद्धतीने या विसकटलेल्या जीवनाचा गाडा सुरळित करण्याचा प्रयत्न करतो. मुलं म्हणजे नक्की काय? वैवाहित जोडी एकमेकांना कंटाळून एका नव्या जीवाला जन्म देते म्हणजे काय?  एका आईची आपल्या मुलाविषयीची भावना, प्रेम, माया काय असते हे या सिनेमातून आपल्याला पाहायला मिळते.

सिनेमात सगळेच कलाकार हे अनुभवी असल्यामुळे त्यातील पात्र त्यांच्या भूमिका या ख-याखु-या वाटू लागतात. या सिनेमातून अश्विनी भावे Ashwini Bhave खूप काळानंतर प्रेक्षकांसमोर परत आल्या असल्यातरी अभिनयावरील त्यांची मेहनत पाहण्यासारखी आहे. सिनेमा सस्पेन्स थ्रिलर असल्यामुळे पुढे काय होईल असा सतत मनात प्रश्न उभा राहतो. एकंदरित संदीप खरे यांनी लिहलेली आणि अजित परब यांनी संगितबद्ध केलेली गाणी आणि सिनेमाचा आशय मनाला छेडून जाणारा आहे. नाटककार प्रशांत दळवी यांनी या सिनेमाचे लेखन केले आहे. आशयसंपन्न नाटकं आणि अनेक मराठी सिनेमाचं दिग्दर्शन केलेल्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी उत्तम पद्धतीने त्यांची कामगिरी पार पाडली आहे.

महेश मांजरेकर Mahesh Manjrekar, मेधा मांजरेकर Medha Manjrekar आणि अनिरूद्ध देशपांडे यांच्या ग्रेट मराठा एंन्टरटेनमेंटद्वारे निर्मित करण्यात आलेला ‘ध्यानीमनी’ जरूर पाहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here