देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांचे, ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. डॉक्टर डॉनने निराळा धुमाकूळ घालत, आपले सगळ्यांचे भरभरून मनोरंजन करण्यास सुरुवात केली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा यासगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या. कोरोनानंतर आता पुन्हाएकदा हि मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. प्रत्येक जण योग्य ती खबरदारी घेऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने शूटिंगच्या कामात व्यस्त झाला आहे.

‘डॉक्टर डॉन’च चित्रीकरण मीरारोड मध्ये न होता कर्जतच्या एका रिसॉर्ट मध्ये होतंय. देवदत्त नागे हा किती फिटनेस फ्रिक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे डॉक्टर डॉनच चित्रीकरण चालू असताना सेटवर जेव्हा शॉट नसतो, तेव्हा तो सेटवरच्या गार्डनमध्ये वर्कआऊट करताना पाहायला मिळतो. कर्जतसारख्या निसर्गरम्य ठिकाणी वर्कआऊट करण्याची मजा काही औरच असल्याचं देवदत्तच म्हणणं आहे. त्याने या वर्कआउटला ‘ग्रीन वर्कआउट’ असं म्हटलंय. सेटवरच बायसेप्सच वर्कआउट निर्सार्गाच्या सानिध्यात करण्याचा आनंद देवदत्त नागे याने सोशल मीडियावर देखील व्यक्त केला आहे.