सध्याच्या घडीला सर्वच ठिकाणी क्रिकेटबाबतीत म्हटलं तर एकाच गोष्टीची चर्चा रंगताना पहायला मिळते, आणि ती निगडीत असते ती भारतीय क्रिकेटच्या सर्वाधिक रोमांचक स्पर्धेची जिला इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल म्हटलं जातं.
सर्वच ठिकाणी आयपीएल आणि त्याच्याशी निगडीत चर्चा रंगत असताना एक भलतीच चर्चा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असताना पहायला मिळत आहे. ही चर्चा इतर कोणाविषयी नसून थेट राहूल चहर या फिरकीपटू गोलंदाजाच्या गर्लफ्रेंडविषयी आहे. राहूल चहर हा सध्या मुंबई इंडियन्स या संघाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे, त्याने भारतीय संघातही आपलं पदार्पण केलेलं आहे.
आत्ता आयपीएल चालू असताना नुकताच राहूल चहर याने त्याच्या गर्लफ्रेंडसोबच त्याचा एक फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला होता. या फोटोने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आणि त्याच्यासोबतची फोटोतली तरूणी नेमकी कोण? हे जाऊन घेण्याची सर्वांना ईच्छा झाली. तर ही तरूणी इतर कोणी नसून इशानी हे तिचं नाव आहे. आणि याशिवाय खास बात म्हणजे, इशानी आणि राहूल यांचा साखरपुडादेखील झालेला आहे.
दोघेही एकमेकांना आधीपासूनच ओळखत असल्याची चर्चाही बऱ्याचदा पहायला मिळाली. आपल्या गर्लफ्रेंड असलेल्या इशानीला काही दिवसांमधेच राहूल त्याची पत्नी बनवणारं असल्याची खबर अगदी पक्कीच आहे. राहूल चहर याच्या त्या फोटोवर अनेकांच्या विविध स्वरूपाच्या प्रतिक्रिया आल्याच्याही पहायला मिळाल्या. सध्या आयपीएल क्रिकेट मॅचेसचा थरार रोज अनुभवत असताना अचानकच नेटकऱ्यांना राहूल चहर याच्या गर्लफ्रेंडबद्दल कुतूहल निर्माण झालं, हे जरा विशेषच म्हणावं लागेल.
आज अनेक क्रिकेटरसिक केवळ क्रिकेटच मनोरंजनात्मक भाग म्हणून पाहत नाहीत तर त्याच्या अवतीभवती फिरणाऱ्या साऱ्या गोष्टींचा विचार, त्याविषयी चर्चा, माहिती या सर्व गोष्टी आजच्या रसिकांना लागतात. राहूल चहर एक उत्तम फिरकीपटू आहे. त्याच्या कौशल्याची प्रचिती त्याने आजवर दिलीच आहे.
राहूलच्या वैयक्तिक बाबीवर बोलायचं म्हटलं तर हा तरूण नव्या दमाचा फिरकीपटू क्रिकेटवर फार प्रेम करतो, त्याची खुप आधीपासूनच क्रिकेटमधे येण्याची ईच्छा तर होतीच. शिवाय आज एका टप्प्यानंतर त्याच स्वप्न हळूहळू साकारत असल्याचीच प्रचिती येत आहे. डोमेस्टिक क्रिकेटचा फार चांगला तगडा अनुभव घेत आपल्या फिरकीची जादू क्रिकेट मैदानावर दाखवताना राहुलची खुबी सहजरित्या दिसून येते.
राहूल त्याच्या केसांच्या हेअरस्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला असताना एका युजरने त्याला प्रश्न विचारला होता की, अशा हेअरस्टाईलचं कारण काय? त्यावेळी तेव्हा ह्याच उत्तर देत त्याचा त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचा अर्थात इशानीचा फोटो शेअर केला आणि ही ते कारण आहे असं सांगितलं.
त्याच्या या फोटोंनंतर अनेकांना बरेच प्रश्न पडले होते. राहूलच्या होणाऱ्या पत्नीला हेअरस्टाईल्स करणं फार आवडतं, असही राहूल म्हणाला. इशानी आणि राहूल यांचा मागेच साखरपुडा झाला आहे. राहूल चहर याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरूनच याची माहितीही इतरांना दिली होती. राहूल आणि इशानी ही जोडी एकमेकांसाठी बनलेली, मेड फॉर इच ऑदर अगदी अशीच दिसते. इशानीचा गॉर्जियस लुकदेखील अनेकांना आवडल्याच पहायला मिळतं आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!