comedychi-bullet-train-vhaya-satara-dimakhdar-sohala




Comedychi Bullet Train vhaya Satara Dimakhdar Sohala

कॉमेडीची बुलेट ट्रेनचा साताऱ्यामध्ये भव्य सोहळा संपन्न !
सातारकरांना मिळालं हसण्याचे आरक्षण …

महाराष्ट्राची लाडकी वाहिनी म्हणून कलर्स मराठीने अवघ्या महाराष्ट्राच्या
हृदयात अढळ स्थान प्राप्त केले आहे. विषयप्रदान मालिका आणि दर्जेदार कार्यक्रम देणारी वाहिनी अशी
ओळख घेऊन कलर्स मराठी वाहिनीने आपली वाटचाल सुरु केली.

महाराष्ट्राचा लाडका कॉमेडी शो
‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ एका नव्या ढंगामध्ये, नव्या स्वरूपामध्ये नुकताच कर्लस मराठीवर सुरु झाला.
संपूर्ण महाराष्ट्राला मिळाल आहे हसण्याचे हमखास आरक्षण, कारण या कार्यक्रमातील लोकप्रिय
विनोदवीरांची खुशखुशीत विनोदशैली, त्यांनी साकार केलेली अतरंगी पात्र, त्यांच्या खुमासदार
विनोदांच्या मेजवानीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली आणि प्रेक्षकांना आपलेसे केले.
‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमातील हे विनोदवीर खास साताऱ्यामध्ये नुकतेच सातारकरांच्या
भेटीला येऊन गेले.

२० ऑक्टोबरला “कॉमेडीची बुलेट ट्रेन” या कार्यक्रमाचा भव्य सोहळा
धुमधडाक्यात पार पडला. ज्याचे सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे Mrunal Deshpande हिने केले. “कॉमेडीची बुलेट ट्रेन”
मधील अंशुमन विचारे, विशाखा सुभेदार, योगेश शिरसाट, नम्रता आवटे, श्याम राजपूत, पूजा
नायक, प्रभाकर मोरे, समीर चौगुले, भक्ती रत्नपारखी, संदीप गायकवाड, प्रसाद, अरुण कदम,
अनुपमा ताकमोघे हे उपस्थित होते.

Ankush Vichare,Vishakha Subhedar,Yogesh Shirsath,Namrata Awate,Shyam Rajput,Pooja Nayak,Prabhakar More,Sameer Chougule,Bhakti Ratnaparkhi,Sandeep Gayakwad,Prasad,Arun Kadam,Anupama Takmoge

mrunal-deshpande

तमाम महाराष्ट्राचे लाडके अरुण कदम ह्या सोहळ्याबद्दल आणि कॉमेडीची बुलेट ट्रेन या
कार्यक्रमाबद्दल म्हणाले, “कॉमेडीची बुलेट ट्रेन वाया सातारा असा आमचा सातारामधील सोहळा
सातारकरांनी दिलेल्या प्रेमामुळे आणि उदंड प्रतिसादाने उत्तम झाला. आमच्याकडून सातारकरांना
हि दिवाळीची एक छोटीशी भेटच होती. आजवर रसिक प्रेक्षकांनी कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि
आम्हाला खूप प्रेम दिल त्यांच्यामुळेच आम्ही आजवर इतके भाग पूर्ण करू शकलो त्यासाठी खूप
आभार. असेच प्रेम आमच्यावर करत रहा आणि आम्ही तुम्हाला असेच मनसोक्त हसवत राहू.”
कॉमेडीची बुलेट ट्रेनमधील विनोदवीरांनी काही धम्माल – बेधडक अशी स्कीट साताऱ्यामध्ये
झालेल्या सोहळ्यात सादर केली आणि विनोदाचा स्फोट संपूर्ण साताऱ्यामध्ये उडाला.

arun-kadam-vishakha-subhedar

 

या
स्कीटसमुळे सोहळ्यास उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच पोट धरून हसण्यास भाग पाडले.
साताऱ्यामधील काही लोकप्रिय स्थळ, खाण्याचे पदार्थ, गड आणि किल्ले, तेथील रांगडेपणा या
गोष्टींना लक्षात घेऊन स्कीटस सादर करण्यात आली. जी सातारकरांना खास आवडली.तसेच आपल्या अनोख्या विनोदशैलीमुळे प्रसिध्द असलेला लाडका विनोदवीर अंशूमन विचारे
म्हणाला, “ कॉमेडीची बुलेट ट्रेन – हसण्याचे आरक्षण या आमच्या कार्यक्रमाला मिळालेला प्रेक्षकांचा
प्रतिसाद ऐकून खूप आनंद होतो.

कलर्स मराठी अतिशय वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम प्रेक्षकांसमोर
घेऊन आली आहे, वेगळा यासाठी कारण प्रथमच कॉमेडीच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश
देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. विनोदाचा दर्जा आणि सामाजिक भान यांचा उत्तम समतोल
राखला गेला आहे जे खूप महत्वाचे असते असे मला वाटते.

प्रेक्षकांचे प्रेम आणि उदंड प्रतिसाद हे
आमच्या यशाचे गणित आहे असे मी आवर्जून सांगेन. तसेच आम्ही कलर्स मराठीचे खूप आभारी
आहोत कि, त्यांच्या सहकार्यानेच आज या कार्यक्रमाला ३०० भाग पूर्ण झाले. सातारकरांना खास
हसविण्यासाठी आम्ही आलो आणि आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

सातारकर म्हणजे कंदी
पेढ्यासारखे…इथल्या माणसांमधला गोडवा, प्रेम आणि रांगडेपणा आम्ही आमच्या स्कीटमध्ये
आणण्याचा प्रयत्न केला आणि तो सातारकरांना आवडला. असेच प्रेम आमच्यावर करत रहा हीच
इच्छा.”
सोहळ्याचा शुभारंभ सुशांत पुजारी ह्याच्या शिवाय चित्रपटाच्या गाण्यावरील नृत्याने झाला. बुलेट
ट्रेनमध्ये कलर्स मराठीवरील प्रसिध्द मालिका गणपती बाप्पा मोरया आणि सरस्वती यामधील
सगळ्यांची लाडक्या पार्वती (सायली पाटील) आणि सरस्वती (तितिक्षा तावडे) देखील स्वार झाल्या.
या दोघींनी पिंगा रे पिंगा आणि डोला रे डोला या गाण्यावर डांस करून उपस्थितांची मने जिंकली.
कमला म्हणून सगळ्यांची लाडकी असलेली अश्विनी कासार तर ऐश्वर्या बडदे हिने फ्री स्टाईल
jazz वर नृत्य सादर केले. मानसी नाईक हिने flower act सादर केला तर दिपाली सय्यद हिच्या
लावणीने सातारकरांची मने जिंकली.

असा हा “कॉमेडीची बुलेट ट्रेन व्हाया सातारा” हा सोहळा दणक्यात सातारा येथे पार पडला.
तुम्हाला हा सोहळा कलर्स मराठीवर २७ नोव्हेंबरला संध्याकाळी ७.०० वा. बघायला मिळणार आहे.

Comedychi Bullet Train vhaya Satara Dimakhdar Sohala Photos

comedychi-bullet-train-manasi-naik        sayali-patil-titiksha-tawade    manasi-naik   deepali-sayyaddeepali-sayyad-lavani

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here