Colors Marathi Serials inGanpati Bappa Morya

कलर्स मराठीवरील ‘गणपती बाप्पा मोरया’ मालिकेतील श्री गणेशांच्या बाललीलांचं झालं

आज पर्यंत अपार कौतुक… आता प्रापंचिक श्री गणेशाला पहायला प्रेक्षक उत्सुक !

गुडी पाडव्याच्या निमित्तावर सुरु होणार मालिकेत दुसरे पर्व २८ मार्च सोम ते शनि रात्री ८.३० वा.

Colors Marathi कलर्स मराठीवर प्रसारीत होणाऱ्या ‘गणपती बाप्पा मोरया’ ह्या मालिकेने गेल्या दीड वर्षात प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. घरातल्या लहानापासून ते अगदी वृध्दांपर्यंत सर्वांनी एकत्र बसून पहावी आणि नुसतीच मनोरंजन म्हणून पाहू नये तर त्यातून बोध घ्यावा अशी हि मालिका सादरीकरणातील वैविध्यामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. गेल्या दीड वर्षात आपण गणेशाच्या जन्मापासूनची गाथा बघितली. त्याच्या दैवी लीला बघितल्या. बाल गणेशाचं गारुड प्रेक्षकांच्या मनावर कायमच राहणार आहे. परंतु आता हि मालिका एक वेगळं वळण घेते आहे. ब्रम्हवर्तात योगसाधनेसाठी गेलेला गणेश कित्येक वर्षांनी चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या घरी परतणार आहे, मालिकेमध्ये एका नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. कारण गणपती बाप्पा मोरया ह्या मालीकेच दुसरं पर्व सुरु होणार आहे. मालिकेमध्ये गणपती बाप्पा मोठा झाला असून, त्याच्याबरोबर रिद्धी – सिद्धीचे आगमन देखील या मालिकेत होणार आहे. मोठ्या गणेशाची भूमिका आदिश वैद्य साकारणार आहे.

गणपती बाप्पा म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं दैवत. कोणाला त्याच्या देवत्वाची प्रचिती येते तर कोणाला दिव्यत्वाची, कोणाला तो आपला मित्र वाटतो, तर कोणाला मार्गदर्शक. तो भक्तांच्या विघ्नांचं हरण करतो आणि दुष्टांच्या अहंकारचं निर्दालन देखील करतो. गणेशाची अशी कित्येक रूपं आपल्याला ह्या मालिकेत वेगवेगळ्या कथानकांच्या माध्यमातून पहायला मिळाली. गणपतीच्या गोष्टी सर्वांनाच माहिती असतात. पण त्या पडद्यावर दृश्य रुपात बघायला मिळण हे या मालिकेचे वैशिट्य आहे. आता लवकरच मोठ्या गणेशाचं कैलासावर आगमन होणार आहे. आगमनानंतर प्रेक्षकांना गणेशाच्या आयुष्यातील आणखी एक वेगळी बाजू बघायला मिळणार आहे, आणि ती म्हणजे गणेशाचं प्रापंचिक जीवन.

गणपतीच्या आयुष्यात रिद्धी आणि सिद्धीचं आगमन कसं होतं त्या दोघीचे स्वभाव कसे आहेत ? त्याचे गणपतीच्या आयुष्यावर कसे पडसाद उमटतील ? अन्नपूर्णा, आदिमाता म्हणजे पार्वती…आता सासूबाईच्या नव्या भूमिकेत कशी

वावरेल ? आईवेडा गणेश विवाहानंतर तिच्यापासून दुरावणार तर नाही ना? लग्नानंतर गणेशाचं प्रापंचिक आयुष्य सुरु होईल परंतु दुसरीकडे त्याच्या दैवत्वाला आव्हान देणाऱ्याही गोष्टी घडतील आणि त्यातून भक्तांचा लाडका बाप्पा आपलं भक्तोध्दाराचं कार्यही योग्य रीत्या कसे पूर्ण करेल… दुष्टांचा संहार करेल आणि सृष्टांवर कृपा देखील करेल हे सगळे बघणे रंजक ठरणार आहे.

 

एकूण काय तर आजवर गणपती बाप्पा मोरयाने जसं प्रेक्षकांना छोट्या पडद्यासमोर खिळवून ठेवलयं तसेच प्रेक्षक मोठ्या गणेशावरही तेवढचं भरभरून प्रेम करतील अशी आशा आहे. आपल्या संसारातले प्रश्न लाडक्या बाप्पाला सांगणाऱ्या भक्तांना बाप्पाचा संसार बघायलाही नक्कीच आवडेल यात शंका नाही.

 

तेंव्हा बघायला विसरू नका गणपती बाप्पा मोरया २८ मार्च सोम ते शनि रात्री ८.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here