Sakhya Re Marathi Serial




Sakhya Re’ Colors Marathi Tv Serial

Sakhya Re Marathi Serial On Colors Marathi

कलर्स मराठीवरील सख्या रे Sakhya Re या मालिकेमध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत. नुकतीच सिद्धेश्वरीची एन्ट्री झालीआहे ती वाड्यामध्ये येण्यामागचा हेतू अजून कोणालाच कळलेला नाही. त्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून समीर आणि वैदेहिच्या मनात असलेली इच्छाम्हणजे लग्न तेही देखील पूर्ण होण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे. कारण लवकरच मालिकेमध्ये समीर आणि वैदेहीचा साखरपुडा होणार आहे.पण आता हा साखरपुडा निर्विघ्नपणे पार होणार कि नाही? कुठल्या साखरपुड्यामध्ये कुठल्या अडचणी येतील ? हे सगळ तुम्हाला मालिकाबघितल्यावरच कळणार आहे. साखरपुड्याला वैदेही बरोबर पहिल्यांदाच समीरची भेट प्रियंवदाशी होणार आहे. या दोघांची भेट झाल्यावर पुढे कायहोईल हे बघणे नक्कीच रंजक असणार आहे.

Colors Marathi 'Sakhya Re' Marathi Serial

 

समीर आणि रणविजयचा चेहरा सारखा आहे त्यामुळे प्रियंवदाच्या मनात शंका आहे कि हा मुलगा समीर आहे कि रणविजय. पण आता हि शंका दूरहोणार आहे. हि शंका दूर करण्यास तुफान तिची मदत करणार आहे. तुफान म्हणजे माणूस नसून हा रणविजयचा लाडका घोडा आहे, जो त्याच्या खूपजवळचा आहे रणविजयचे तुफानवर जीवापाड प्रेम आहे. तुफान रणविजयने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकतो. जेंव्हा साखरपुड्याच्या दिवशी प्रियंवदासमीरला बघते तेंव्हा रणविजयने सांगितलेली एक गोष्ट तिला आठवते रणविजयने तिला सांगितलेले असते कि, “माझ्याव्यतिरिक्त दुसरी कुणीहीव्यक्ती तुफानवर बसूच शकत नाही. हे आठवताच ती ठरवते कि आता हाच पर्याय आहे हे जाणून घ्यायचा कि हा मुलगा समीर आहे कि रणविजय.

'Sakhya Re' Marathi Serial Colors Marathi

 

तुफान (घोडा) बरोबर चित्रीकरण करणाचा अनुभव विचारल्यास सुयश म्हणाला, “प्रत्येक प्राण्याशी एक नातं निर्माण करणं खूप गरजेच असत. माझाहा पहिलाच अनुभव होता मी नक्कीच घाबरलो नव्हतो पण एका  प्रकारच दडपण आणि आव्हान नक्कीच होतं. कारण तुफान हा घोडा रणविजयाच्याखूपच जवळचा आणि ते स्क्रीनवर दाखवायचं म्हणजे तस नातं निर्माण करण खूप महत्वाच होतं, तुफान आणि माझ्यात ते नातं निर्माण देखील झालंत्यामुळे प्रेक्षकांना ते लवकरच दिसेल. इतक नक्की सांगेन तुफान बरोबर चित्रीकरण करायला खूपच मजा आली”.

आता हे सगळ बघण रंजक रहणार आहे कि, तुफान समीरला बसू देतो कि नाही ? समीर आणि वैदेहीचा साखरपुडा निर्विघ्नपणे पार पडतो ? तेंव्हाबघत रहा सख्या रे फक्त कलर्स मराठीवर.

Suyash Tilak Sakhya re

Suyash Tilak

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here