कलर्स मराठी – नवे वर्ष नवा उत्साह !
नवीन वर्षाची चाहूल लागली कि, सगळ्यांच एक नवा उत्साह येतो आणि सगळे संकल्प तयार करण्यासाठी सज्ज होतात. सगळेच नव्या वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहाने करतात. गेल्या वर्षाच्या जुन्या आठवणी आपल्या सगळ्यांना आठवू लागतात, गेलं वर्ष काय काय देऊन गेलं आणि येत्या वर्षी काय काय करायचं आहे याचे प्लनिंग सुरु होतं. काही कलाकार संकल्प करतात तर काही कलाकार करत नाहीत. तुमच्या कलर्स मराठीवरील घाडगे & सून, सरस्वती, राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतील लाडक्या कलाकारांनी २०१७ मधील काही आठवणी आणि येत्या वर्षाचे संकल्प सांगितले आहेत.
घाडगे & सून (अतिशा नाईक, भाग्यश्री लिमये आणि चिन्मय उदगीरकर)
अमृता घाडगे (भाग्यश्री लिमये)
२०१७ : गेल्या वर्षी मला “घाडगे & सून मालिका” मिळाली.
२०१८ : येत्या वर्षी मी माझ्या संगीताकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहे.
२०१७ : हे वर्ष माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. कारण या वर्षात माझं अभिनेत्री होण्याच लहानपणापासूनचं स्वप्न प्रत्यक्षात आलं. पण, हा प्रवास सोपपा नव्हता कारण अपयश आलं की खचणं हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे माझ्या या स्वभावाला मुरड घालून यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न करणं हा माझं संकल्प होता. मी audition देतं राहिले अनेकदा सिलेक्शन झालं नाही तर कधी होता होता यशानं हुलकावणी दिली तरीही अपयशानं खचून न जाता अधिक उत्साहानं पुढची audition देत राहिले. आणि प्रयत्नांना यश अखेर मिळालं “घाडगे & सून” या मालिकेतील अमृता या मुख्य भूमिकेसाठी माझं सिलेक्शन झालं आणि यावर्षीच माझं स्वप्नं मी पूर्ण केलं. २०१८ या आगामी वर्षात मात्र मला माझ्या आवाजाकडे माझ्या गाण्याकडे विशेष लक्ष द्यायचे आहे त्यासाठी मी दररोज रियाझ करणे हे माझ्यासाठी महत्वाचं राहिलं.
अक्षय घाडगे (चिन्मय उदगीरकर )
२०१७ : अक्षय घाडगे म्हणून मला रसिक प्रेक्षकांनी जे भरभरून प्रेमं दिलं
२०१८ : चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करेन
२०१७ : गेल्या वर्षाचं बोलायचं झालं तर मी एका नव्या भुमिकेमध्ये नव्या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला
आलो. ती भूमिका म्हणजे कलर्स मराठीवरील “घाडगे & सून” मालिकेमधील अक्षय घाडगे. या माझ्या
भूमिकेला रसिक प्रेक्षक भरभरून प्रेमं देत आहेत आणि एका कलाकरासाठी याहून अधिक चांगली भेट
किंवा क्षण कुठला असू शकतो. त्यामुळे यावर्षी ही मालिका आणि भूमिका मिळणं माझ्यासाठी खूप मोलाचं
आहे असे मी म्हणेन.
२०१८ : मी दरवर्षी संकल्प करतो. पण या वर्षांमध्ये मला एक गोष्ट कळाली ती म्हणजे जी गोष्ट आपण
करू शकतो तिचं गोष्ट करण्याचे संकल्प करावे. म्हणून येत्या वर्षी मी एक चांगला माणूस बनण्याचा
प्रयत्न करणार आहे. आज आहे त्याहून अधिक चांगला माणूस मी उद्या कसा बनेन हा माझा प्रयत्न
असेल.
वसुधा घाडगे (अतिशा नाईक)
२०१७ : हे वर्ष मला खूप काही देऊन गेलं असं मी म्हणेन. या वर्षी मी “तू माझा सांगाती” हि मालिका
केली ज्यामध्ये माझी भूमिका अप्रतिम होती. त्यानंतर आता “घाडगे & सून” मधील वसुधा घाडगे ही
भूमिकादेखील प्रेक्षकांना खूप आवडते आहे. आणि याच वर्षी माझं नवीन नाटकं “श्यामची आई” सुध्दा सुरु
झालं. त्यामुळे मला घाडगे & सून मालिका मिळाल्यापासून २०१७ हे वर्ष मला खूप उसंत देणारं गेलं असं
मी म्हणेन. खूप काही कमवलं आणि खूप छान भूमिका केल्या याचा मला आनंद आहे.
२०१८ : येत्या वर्षाचा संकल्प असं काही नाही पण खूप मित्र – मैत्रिणी बनवणार हे नक्की. सगळ्यांना
नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा.
सरस्वती (तितिक्षा तावडे आणि आस्ताद काळे)
सरस्वती (तितिक्षा तावडे)
२०१७ हे वर्ष कधी आलं आणि कधी गेलं कळलचं नाही. खूपचं सकारात्मक दृष्टीकोन या वर्षानी मला
दिला. तसेच माझ्यासाठी खूप उर्जा देणार हे वर्ष ठरलं. या वर्षी मला सरस्वती मालिकेमध्ये दुर्गा आणि
सरस्वती अश्या दोन भूमिका करण्याची संधी मिळाली. प्रत्येक कलाकाराचं हे स्वप्न असतं कि, वेगवेगळ्या
भूमिका करण्याची संधी मिळावी पण मला सरस्वती या मालिकेनेच ही संधी दिली. या मालिकेद्वारे मला
खुप छान आणि आव्हानात्मक गोष्टी करायला मिळाल्या आणि त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान
समजते.
२०१८ : येत्या वर्षी जास्तीत चांगल कामं करायचं आणि कुठल्याही गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने बघायचं
नाही असं मी ठरवलं आहे. पुढच्या वर्षी देखील मला असच सरस्वती मालिकेद्वारे प्रेक्षकांच प्रेम मला मिळो
हीच आशा आहे.
राघव भैरवकर (आस्ताद काळे) – आस्ताद काळे सरस्वती मालिकेमधून प्रेक्षकांना राघव भैरवकर या
भूमिकेतून गेल्या दोन वर्षापासून भेटीला येत आहे. मालिकेमध्ये तो साकारत असलेली राघवची भूमिका
प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. २०१८ मध्ये कोणते नवे संकल्प करणार आहे आणि त्याची काय
तयारी केली याबद्दल बोलताना आस्ताद काळे म्हणाला.
२०१७ साली माझं स्वत:चं मुंबई मध्ये घर झालं. तसेच सरस्वती मालीकेनिमित्त मला दुबईला जाण्याची
संधी मिळाली.
२०१८ मध्ये तसे बरेच संकल्प आहेत. स्वत: मध्ये काही बाबतीत अमुलाग्र बदल करायचे आहेत. मी
लिहित असलेली एक कथा येत्या वर्षामध्ये पूर्ण करायची आहे. तसेच २०१८ मध्ये किमान दोन तरी
सिनेमे करायचे आहेत आणि एक नाटक देखील करायचं आहे.
राधा प्रेम रंगी रंगली (प्रेम देशमुख आणि राधा देशमुख)
प्रेम देशमुख (सचित पाटील)
२०१७ हे वर्ष माझ्यासाठी खूप महत्वाचं ठरलं. १३ वर्षांतर मी छोट्या पडद्यावर परतलो कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेद्वारे जी अतिशय सुखद घटना होती. ज्यामध्ये मी प्रेम देशमुख नावाची भूमिका साकारत आहे. ही भूमिका मी आजवर जितक्या भूमिका पडद्यावर साकारल्या त्याहून अगदीच वेगळी आहे त्यामुळे माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. जसं प्रेक्षकांनी माझ्या सिनेमांवर प्रेम केलं आर्शिवाद दिले तसेच आशीर्वाद ते या मालिकेला देखील देत आहेत हे बघून खुप आनंद झाला.
२०१८ : संकल्प म्हणायचा झालं तर मी म्हणेन, मी संकल्प करत नाही. प्रत्येक वर्षी एक चांगली गोष्ट करणं महत्वाचं असतं असं मला वाटतं. त्यातील एक म्हणजे आपला परिसर स्वच्छ ठेवणे, रस्त्यात कचरा न टाकणे जे मी सुध्दा पाळतो आणि आयुष्यभर पाळत राहीन. नागरिक म्हणून आपल्यावर काही सामाजिक जबाबदाऱ्या आहेत आणि त्या पूर्ण करणे हे आपले प्रथम कतर्व्य आहे असं मला वाटत. त्यातील दुसरी गोष्ट म्हणजे traffic चे नियम पाळणे खूप म्हत्वाच आहे आणि प्रत्यकाने पाळलेच पाहिजे. दुसरा संकल्प असा कि, कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देणे.
माधुरी देशमुख (कविता लाड)
२०१७ : जवळजवळ दिड वर्षांनी कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेद्वारे मी पुन्हा रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले त्याचा आनंद आहे. माझी भूमिका जरा वेगळीच आहे माधुरी देशमुख स्वतंत्र विचार करणारी स्त्री आहे, ती करारी आहे तसेच ती खंबीर आहे. अश्या प्रकारची वेगळी भूमिका मला करायला मिळते आहे तर बरं वाटत आहे.
२०१८ : मला असं वाटत कि, संकल्प करण्यासाठी नवीन वर्षाची वाट पाहायला नको.
तुमच्यासाठी काय पन – संदीप पाठक
संदीप पाठक म्हणत आहेत “२०१७ ची माझी वारी ठरली वैशिष्ट्यपूर्ण ”
माझ्यासाठी हे वर्ष ठरलं इच्छापूर्ती करणारं वर्ष
२०१७ साल हे माझ्यासाठी खूपच महत्वपूर्ण ठरलं. या वर्षाच्या खूप आठवणी आहेत, खूप महत्वाच्या
घटना आहेत ज्या या वर्षी घडल्या. मी असं म्हणेन २०१७ सालच्या माझ्या या वारीमध्ये माझ्या तीन
महत्वाच्या इच्छापूर्ण झाल्या. माझ्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मी कधीच कुठल्या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन केले नव्हते. पण माझी ही इच्छा कलर्स मराठी या वाहिनीने पूर्ण केली. या वर्षी मी कॉमेडीची
GST एकस्प्रेस आणि सध्या सुरु असलेला आणि प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत असलेला तुमच्यासाठी
काय पन या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी मला मिळाली आणि माझी बऱ्याच वर्षांपासूनची
अपुरी इच्छा पूर्ण झाली.
तसेच प्रत्येक मराठी माणसाचं वा महाराष्ट्रात रहाणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं कि, आयुष्यात
एकदातरी पंढरपूरच्या “वारीला” जाण्याची संधी मिळावी आणि माझी ही इच्छा २०१७ साली पूर्ण झाली.
म्हणून मी म्हणेन कि, २०१७ हे वर्ष माझ्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण अस ठरलं ज्यामध्ये माझी इच्छापूर्ती
झाली. ही वारी म्हणजे “आठवणीतला ठेवा” आहे असे मी म्हणेन. तसेच “व-हाड निघालंय लंडनला” हे जे
आमचं नाटक आहे ते महाराष्ट्रात तर प्रसिध्द आहेच पन माझी इच्छा होती कि मुंबईकरांना देखील या
नाटकाचा आस्वाद घेता यावा अशी माझी इच्छा होती. माझी हि इच्छा प्रशांत दामले यांच्या पाठिंब्यामुळे
पूर्ण होऊ शकली.