वास्तू शास्त्रानुसार, घडी बंद असणे आणि घडी चुकीच्या दिशेस ठेवल्याने खूप नुकसान होऊ शकते.
घड्याळ हे वेळ दाखवण्याचे काम करते. पण हिंदू शास्त्र पुराणानुसार घड्याळ हे भविष्याचे संकेत पण देतं. जर या घड्याळाला चुकीच्या दिशेस लावले तर खूप मोठे नुकसान पण होऊ शकते. तर कसा करायचा याचा चांगला वापर आणि कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची ते आज आपण जाणून घेऊ.
बरेच लोक आपल्या घरी घडी अश्या ठिकाणी लावतात कि घरात प्रवेश केल्यानंतर लगेच ती दृष्टीस पडते. पण वास्तुशात्रानुसार असा होणं अशुभ मानलं जातं.
वास्तुशात्राच्या अनुसार घराबाहेर जातेवेळी किंवा घरात प्रवेश करतेवेळी घडी पाहिल्याने घरात आप्पती येऊ-जाऊ शकते. कारण घडीमध्ये चांगला आणि वाईट दोन्ही प्रकारचा वेळ असतो.
घरामध्ये कधीच घडी दक्षिण दिशेस लावली नाही पाहिजे. कारण अस केल्यास घरात दारिद्य येत. या दिशेस वास्तुशात्रात अशुभ मानले जाते.
दक्षिण दिशेस घडी लावल्याने पैसे व्यर्थ खर्च होतात. यामुळे घरात अनेक संकटे येतात आणि नकारात्मक वातावरण तयार होते.
वास्तुशात्रानुसार दक्षिण दिशेला यमाचा कोपरा मानले जाते. म्हणून जर या दिशेने घड्याळ ठेवली तर तिथे राहणा-या लोकांच्या प्रगतीवर परिणाम होईल.
घरामध्ये उलट दिशेने घड्याळ लागू केल्यास कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे त्यांना नेहमी काही न काही आजर जखडु शकतो.
वास्तुशात्रानुसार घरामध्ये कधीच तुटलेली/फुटलेली घडी ठेऊ नये. असं केल्यामुळे कामामध्ये व्यत्तय येऊ शकतो आणि करावयाचे काम बिघडू शकते.
तुटलेली/फुटलेली घडी ठेवल्यामुळे धनसंपत्तीची हानी होऊ शकते. यामुळे माता लक्ष्मी घरात टिकत नाही.
वास्तुशात्रानुसार घरामध्ये कधीच बंद पडलेलं घड्याळ ठेऊ नये. असं केल्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते.
घरामध्ये बंद घडी आपल्या समोर ठवल्याने आपले भाग्य अश्याप्रकारे बिघडते कि आपले कोणतेही काम होत नाही. यामुळे आपल्याला विविध संकटांचा सामना करावा लागतो.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.