झी मराठी वरील सुप्रसिद्ध कार्यक्रम ‘चला हवा येवूद्या’च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला विनोदी कलाकार नितिन आनंद बोढारे हा होय. आपल्या निखळ अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राला त्याने पोट धरून हसायला भाग पाडले. बायकी आवाजातील त्याची गुंडाची भुमीका अख्खा महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. नितीनला खरी ओळख मिळाली ते चला हवा द्या मधील ‘पिंकी’ या भूमिकेमुळेच. पण इथवर मजल मारण्यासाठी या कलाकाराला आपल्या वैयक्तिक जीवनात खुप संघर्ष करावा लागला. नितीन आनंद बोढारेची संघर्षमय कहाणी तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
नितीन बोढारेचा जन्म 21 नोव्हेंबर 1985 साली मुंबई मधील गोरेगाव या शहरात झाला. तो मुळचा नाशिक जिल्ह्याचा असून नोकरी निमित्त नितीनचे वडिल मुंबईत स्थायिक झाले. नितीनचे वडिल B.S.T मध्ये नोकरी करत त्यामुळे अतिशय मध्यम वर्गीय कुटुंबात तो लहानाचा मोठा झाला. पुढे आंबेडकर काॅलेज मध्ये त्याने शिक्षण पूर्ण केले. अभ्यासाचा कंटाळा येत असल्याने तो आयुष्यात यशस्वी होण्याचे मार्ग शोधू लागला आणि त्याची ओळख एकांकिकेत काम करणाय्रा काही मित्रांशी झाली.
लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्यामुळे त्याने यात नशीब आजमवण्याचे ठरवले आणि स्वतःला झोकून दिले. काॅलेज करत असतानाच एकाच वेळी जाॅब सोबतच एकांकिका करत राहिला. आणि त्याची ओळख दिग्दर्शक राजेश देशपांडे यांच्याशी झाली.
त्यांनी त्याला ‘खळ खट्याक’ नावाच्या व्यावसायिक नाटकात काम देवून नितीनला पहिला ब्रेक दिला. त्यानंतर त्याने मागे वळून कधीच पाहिले नाही. राजेश देशपांडे यांनी त्याची जिद्द आणि कलेची मेहनत पाहून ‘कोणी घर देता का घर’ या सिनेमात दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी दिली आणि तो नेहमी संधीचे सोने करत राहिला.
त्याच दरम्यान ओळख झाली सागर कारंडे या अभिनेत्याशी. त्याने काही मोजक्या एपिसोड करिता ‘चला हवा येवूद्या’ मध्ये बोलावल होतं. पण डाॅ.निलेश साबळे यांनी ‘पिंकी’ या व्यक्तिरेखेला विनोदाचा भक्कम साज चढवला. पिंकीचा आवाज आणि पेहरावामुळे नितीन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
डाॅ. निलेश साबळे यांनी त्याला ‘चला हवा येवूद्या’ टिम मधील परमनंट सदस्य बनवले. बाॅलीवूड मधील शाहरूख,सलमान,अमीर,जाॅन अब्रहम तसेच अनिल कपूर सारख्या अनेक सेलिब्रेटिंना त्याने पोट धरून हसायला भाग पाडले.
‘चला हवा येवूद्या’ या कार्यक्रमा बरोबरच तो अनेक हिंदी तसेच मराठी चित्रपटात भुमीका करत राहिला. नितीन आनंद बोढारेची करिअरची गाडी सुसाट सुरू आहे. नितीन केलेल्या हिंदी मराठी चित्रपट,मालिका तसेच वेब सिरीजचे नावे पुढीलप्रमाणे:
●मालिका: नकुशी, सतराशे साठ सासूबाई.
●हिंदी चित्रपट: बँजो,डॅडी
●मराठी चित्रपट: दगडी चाळ,हाफ तिकीट,मंकी बात, प्यार वाली लवस्टोरी, कुमारी गंगूबाई नाॅन मॅट्रीक, गोविंदा, ऑर फन किड्स, मेड इन महाराष्ट्र, आईच्या गावात, भेटलीस तु पुन्हा.
●वेबसिरीज: समांतर
या ऐवजी नितीन नविन वर्षात अनेक चित्रपटात काम करताना पाहायला मिळणार आहे.
मनात जिद्द असेल तर जीवनातली अवघड वाट देखील सहजपणे पार करता येते. ही गोष्ट नितीन कडून शिकण्या सारखे आहे. नितीन आनंद बोढारे या विनोदी कलाकाराला स्टार मराठी कडून पुढील वाटचालीस खुपसाय्रा शुभेच्छा!