Nilesh Sable Akshay Kumar

 

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर बॉलिवुडची मंडळीही हजेरी लावत आहेत. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीचा हा मंच आता हिंदावाल्यांनाही खुणावत आहे.
आपल्या आगामी ‘रूस्तम’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी या कार्यक्रमात आता बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमार येणार आहे.
येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच ८ आणि ९ ऑगस्टला रात्री ९.३० वा. हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत.
‘चला हवा येऊ द्या’ मध्ये आलेल्या कलाकारांच्या प्रसिद्ध कलाकृतीवर चित्रपट काढण्याची हौस थुकरटवाडीतील मंडळीना असते.
अक्षयच्या उपस्थितीतही या मंडळीने अक्षय कुमारच्या सुप्रसिद्ध ‘हेरा फेरी’ चित्रपटाची आपली वेगळी आवृत्ती सादर केली ज्याला अक्षयनेही भरभरून दाद दिली.

याचसोबत थुकरटवाडीच्या पोलिस स्टेशनमध्ये अक्षयला बोलावून त्याच्यावर अनेक गंमतीशीर आरोपही करण्यात आले.
अक्षय कुमार जसा स्टंटसाठी लोकप्रिय आहे तसाच त्याच्या अनेक लोकप्रिय गाण्यांच्या डान्स परफॉर्मन्ससाठीही प्रसिद्ध आहे.
अक्षयच्या अशाच गाजलेल्या गाण्यांवर ‘चला हवा येऊ द्या’ च्या कलाकारांनी ठेका धरला.
अक्षयच्या उपस्थितीने रंगलेले ‘चला हवा येऊ द्या’ चे हे धमाकेदार भाग येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच ८ आणि ९ ऑगस्टला रात्री ९.३० वा. झी मराठीवरून प्रसारित होतील.

 

Chala Hawa Yeu Dya Nilesh Sable Akshay Kumar Sagar Karande Shreya Bugde Chala Hawa Yeu DyaShreya Bugde Sagar Karande Akshay Kumar Chala Hawa Yeu Dya   Chala Hawa Yeu Dya Akshay Kumar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here