Chaahool Holi and Rangapanchmi special
चाहूल मध्ये साजरी होणार होळी आणि रंगपंचमी !
रंगपंचमीच्या निमित्ताने सर्जा आणि शांभवीमध्ये मैत्री …
होळीची पार्श्वभुमी आपण सर्वजण जाणतोच. होलिकादहनामधे सर्व वाइट गोष्टी व विचार नष्ट करुन होळीची पुजा होते. होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे ‘रंगपंचमी’. ‘रंगपंचमी’ हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात. कलर्स मराठीवरील चाहूल मालिकेमध्ये होळी आणि रंगपंचमी हे दोन्ही सण साजरे होणार आहेत. भोसले परिवार, वाड्यामध्ये नुकतीच आलेली शांभवी हे सगळे मिळून होलिकादहन आणि रंगपंचमी हा सण साजरा करणार आहेत. या होलिकादहनाच्या निमित्ताने वाड्यामधील वाईट गोष्टींचा नाढ होईल ? शांभवी वाड्यामधील रहस्य जाणू शकेल ? निर्मलाच्या हेतुंचे दहन होईल? हे बघणे रंजक असणार आहे. या शुभ दिनाच्या दिवशी काही अघटीत तर होणार नाही ना ? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात असतील.
Chaahool चाहूल मालिके मध्ये भोसले कुटुंबांनी होळीची जय्यत तयारी केली आहे. वाड्याच्या बाहेर होळी सजवली असून घरच्या सगळ्यांनी तिची पूजां केली, आणि सर्जाने होळीला अग्नी दिला. पण याचवेळी शांभवीच्या पदराला आग लागली आता हे कस झाल? कोणी केल? निर्मालानेच तर नाही ना केल हे तुम्हाला मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. रंगपंचमीच्या दिवशी सर्जा, शांभवी आणि भोसले परिवार रंग खेळत असताना
निर्मलाला देखील तिची आणि सर्जाची रंगपंचमी आठवते. तिने आणि सर्जाने रंग पंचमी कशी खेळली होती, किती रंग उधळला होता हे सगळच निर्मलाला आठवत. भोसले वाड्यामध्ये सगळे रंगपंचमी खेळले आहेत. कुठेही पाण्याचा अपव्यय न करता फक्त विविध रंगांनी देखील रंग पंचमीचा आनंद तितकाच लुटता येतो हे नक्की असा, संदेश चाहूल मालिकेचे कलाकर देत आहेत. रंग पंचमीच्या दिवशी सर्जा आणि शांभवीला रंग खेळताना बघून निर्मलाला वाईट वाटत आणि खूप राग येतो. निर्मलाला हे सहन होत नाही आणि ती निर्णय घेते कि मी सर्जा आणि शांभवीला कधीच एकत्र येऊ देणार नाही.
या सगळ्या घटनांमध्ये सर्जा आणि शांभवी मध्ये मैत्रीची चाहूल लागते पण आता हि मैत्री प्रेमात बदलू शकेल ? निर्मला ते होऊ देईल ? हे जाणून घेण्यासाठी बघा चाहूल महासप्ताह १३ ते १८ मार्च रात्री १०.३० वाजता फक्त कलर्स मराठीवर.