चाहूल २ च्या सेटवर कोजागिरी पौर्णिमा दणक्यात साजरी झाली !

Colors Marathi कलर्स मराठीवरील चाहूल २ च्या सेटवर काल कोजागिरी पौर्णिमा दणक्यात साजरी झाली., मालिकेमधील सगळेच कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि संपूर्ण टीम यामध्ये सहभागी झाले होते. सेटवर FANCY ड्रेस स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. या मध्ये केतकी पालव म्हणजेच राणी हम दिल दे चुके सनम मधील ऐश्वर्या राय तर अक्षर कोठारी सर्जा आवारा चित्रपटामधील राज कपूर बनला होता, रेश्मा शिंदे शांभवी कूछ कूछ होता मधील अंजली तसेच तारका म्हणजेच रेवा माधुरी दिक्षित बनली, भक्ती रत्नपारखी दबंग सिनेमातील सोनाक्षी बनली होती. कलाकारांनी सेटवर एकत्र येऊन खाद्यपदार्थ आणि मसाले दुध देखील बनवले होते विशेष म्हणजे हे मसाले दुध आपल्या लाडक्या अक्षरने बनवले होते.

या कोजागिरीच्या पार्टीमध्ये सर्व युनिटने मिळून सेल्फी काढला, एकत्र डान्स केला. नेहेमीच्या रुटीनमधून जरा वेगळेपणा आणि उत्साह सेटवर निर्माण झाला. त्यातीलच काही फोटोज …

Colors Marathi Chaahool 2 Serial Kojagiri Paurnima Photos