Bun maska – बन मस्का मालिका आता नवीन वेळेवर

1691

Zee Yuva झी युवा वरील शिवराज आणि शिवानी यांच्या अभिनयाने सजलेली सर्वांची आवडती मालिका Bun maska “बन मस्का “ आता एका नवीन वेळेवर दाखवण्यात येणार आहे . हीमालिका आधी सोमवार ते शुक्रवार  रात्री ८ वाजता पाहायला मिळायची .मात्र २२ मे  पासून या वेळेवर सुरुची अडारकर आणि हर्षद अतकरी यांची हॉस्पिटलच्याभावविश्वावर प्रकाश टाकणारी अंजली ही नवीन मालिका सुरु होत आहे . शिवराज आणि  शिवानी यांच्या प्रेम कहाणी ची ही मालिका रात्री  सोमवार पासून रात्री १०वाजता दाखवण्यात येईल . सध्या शिवराज आणि शिवानी यांच्यात नातेसंबंध पूर्णपणे बिघडलेले असून शिवराज या मालिकेत  आलेली नवीन कलाकार आकृतीदासगुप्ता म्हणजेच उर्मिला निंबाळकर हिच्याबरोबर आता सौमित्र म्हणजेच शिवराज साखरपुडा करणार आहे . आता सौमित्र आणि मैत्रयीच्या प्रेमाचे नक्की काय होतेहे पाहण्यासाठी सोमवार ते शुक्रवार रोज रात्री १० वाजता  झी युवावर बन मस्का पाहावेच लागेल .