‘विदर्भ एक्स्प्रेस’ म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज उमेश यादव आजवर आपल्या कारकीर्दीच्या प्रारंभी कराव्या लागलेल्या संघर्षाबद्दल अनेकदा उघडपणे बोलला आहे. पण उमेशला पोलिस दलात भरती होण्याची तीव्र इच्छा होती आणि त्यासाठी त्याने खास प्रशिक्षणही घेतले होते, याची माहिती फारच थोड्यांना असेल. झिंग गेम ऑन या कार्यक्रमाच्या आगामी भागात त्याने सूत्रसंचालक करण वाही याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना त्याने या प्रशिक्षण काळातील काही घटनांची माहिती दिली. त्यात त्याने सांगितले की केवळ दोन गुण कमी पडल्याने आपण पोलिस दलात भरती होण्यास मुकलो होतो. अर्थात पोलिस दलात जरी जागा नाही मिळाली, तरी आपली क्रिकटची कारकीर्द बहरली आणि त्याला भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली, याबद्दल तो आभारी आहे. उमेश यादवने आपल्या चाहत्यांना आपल्या जीवनात डोकावण्याची संधी दिली असून यावेळी तो करण वाहीबरोबर काही गंमतीदार खेळही खेळला. तसेच त्याने बॉलीवूडपटांतील काही प्रसिध्द पोलिसांचे संवादही म्हटले.

उमेश यादवचे आजवर न पाहिलेले व्यक्तिमत्त्व पाहा ‘झिंग गेम ऑन’ कार्यक्रमात शनिवार-रविवारी संध्याकाळी 7.00 वाजता फक्त ‘झिंग’वर!