आपल्या सर्वांना माहितच आहे की बॉलिवुडमधील महानायक हे अमिताभ बच्चन यांना म्हटलं जातं. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल परंतु याच महानायकाने चक्क स्वत:च्या घरात एकदा चोरी केली होती. अमिताभ बच्चन म्हणजे आज एक धीरगंभीर आणि सतत स्वत:ला कामासाठी जणू वाहून घेतलेले कलाकार आहेत. आज वयाच्या सत्तरीनंतरही ते ज्या जोमाने सिनेसृष्टीत आपला अभिनय करतात ते भल्याभल्यांना थक्क करून सोडणारं पहायला मिळतं. सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांच्या गमतीजमती अथवा त्यांनी केलेल्या काही अजबगजब गोष्टी बऱ्याचदा आपल्या कानावर पडत असतात. आणि या गोष्टी ऐकल्यावर आपल्याला जाणिव होते की, कलाकारदेखील आपल्यासारखा एक सामान्य माणूस असतो. तोदेखील असं फार अगदीच वेगळ्या राहणीमानात जगत नाही. फरक पडलेला असतो तो केवळ संपत्ती आणि थोड्याफार जगण्याच्या लाईफस्टाईलमधल्या लॅव्हिशपणाचा. काही कलाकार तर त्या लॅव्हिशपणाऐवजी अगदी साध्या पद्धतीने जगत असल्याचेही पहायला मिळतात.
तर मुद्दा मुळात काहीसा असा आहे की, अमिताभ बच्चन यांनी जर त्यांच्या स्वत:च्याच घरात चोरी केली तर ती कशासाठी केली असेल? किंवा अशी कोणती खास गोष्ट असेल जिच्यासाठी त्यांना चक्क चोरी करून ती घ्यावीशी वा पहाविशी वाटली असेल? चला तर मग आपण जाणून घेऊयात हे नेमकं प्रकरण काय आहे? अमिताभ बच्चन जिथे लहानपणी रहायचे तिथे एक कोठी होती, ज्याच्या आत एक रानी मुलगी रहात असायची. तिच्याबद्दलचे अनेक किस्से अमिताभ बच्चन यांच्या कानावर आलेले होते. शिवाय अमिताभ बच्चन ज्या ज्या वेळी त्या कोठीसमोरून जात असत त्या त्या वेळी त्यांना ती कोठी एक रहस्यमय गोष्ट वाटत असायची. कारण त्याच्या एकदम आत नेमकं काय आहे? किंवा ती रानी मुलगी कोण आहे? याबाबत त्यांना मनात कुतूहल निर्माण झालं होतं.
आता मनात निर्माण झालेलं कुतूहल कशा पद्धतीने शांत करावं? तर त्या कोठीच्या दारावर असलेल्या पहारेकऱ्याला ते भेटले, त्या पहारेकऱ्याने त्यावेळी त्यांच्याकडून काही पैसै घेऊन मग त्यांना आत जाण्याचा मार्ग मोकळा करून देण्याची गोष्ट सांगितली. मग हा विचार अमिताभ यांच्या डोक्यात भिनू लागला. पण जवळ पैसे नव्हते. एके दिवशी घरात त्यांनी पैसे शोधायला सुरूवात केली, घरात कुणीच हजर नव्हतं. अमिताभ यांना आईच्या ड्रेसिंग टेबलच्या आत काही पैसे सापडले ते एकूण चार आणे होते. पण पुढे जे घडलं ते जरा वेगळचं होतं, अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्या पहारेकऱ्याने घात केला. अमिताभ बच्चन कोठीवर गेले, त्यांनी पहारेकऱ्याला पैसेही दिले, पण त्याने मात्र पैसे ठेवून घेतले आणि अमिताभ बच्चन यांना आत प्रवेशच करू दिला नाही. इकडे घरात अमिताभ बच्चन यांची आई पैशांची शोधाशोध करू लागली होती. अमिताभ बच्चन घरी आल्यानंतर आईला समजलं होतं, आईने त्यांना पुर्णत: फटके लगावायला सुरूवात केली.
इतका की त्यांचा गाल चांगलाच लाला झाला होता. त्यानंतर अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी त्यांना चोरी करण्याच्या बाबतीत एक मोलाचा उपदेश सहजरित्या समजावून सांगितला, ज्यामुळे पुढे अमिताभ बच्चन कधीही मर्यादा सोडून असं वागले नाहीत. परंतु त्या काळात अमिताभ बच्चन यांची जी ईच्छा आणि उत्सुकता होती ती मात्र अर्धवटच राहिली, त्या कोठीच्या आतल्या रानी मुलीला त्यांना काही कधी पाहताचं आलं नाही. या घटनेने अमिताभ बच्चन मात्र फार काही शिकून गेले होते, त्यांना समजलं होतं. एखादी गोष्ट लागत असेल तर विचारून घेतली पाहिजे, चोरी करणारे इतरांच्या नजरेत पडतात, चोरी करणाऱ्यांबद्दल माणसाच्या मनात घृणा निर्माण होते. त्यानंतर पुढे आजवर अमिताभ बच्चन यांची वाटचाल अगदी प्रभावी राहिली आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!