80 आणि 90 च्या दशकाची प्रसिद्ध अभिनेत्री फराह नाझबद्दल कोणाला माहिती नाही. त्या काळातील स्टार असलेली फराह शॉर्ट टेम्पर्ड, अॅग्रेसिव्ह अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाई. ती कधी कुणाला चोप देईल, याचा नेम नसे. तिच्या याच अशा वागण्यामुळे ती सतत चर्चेत राहायची. 80 च्या दशकातील ती सर्वात वादग्रस्त अभिनेत्री होती. तब्बू ही फराहची धाकटी बहीण आहे.
आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने बॉलिवूडवर राज्य करणार्या फराह नाझने तिच्या कारकीर्दीत अनेक हिट चित्रपट दिले, पण करियरच्या शिखरावर असताना लग्न करून ती अचानक गायब झाली. फराहने बिंदू दारा सिंगशी लग्न केले. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही.
एकदा ‘कसम वर्दी की’ या सिनेमाच्या सेटवर फराहने अभिनेता चंकी पांडेची धुलाई केली होती. स्वत: फराहने एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. चंकी नेहमी ‘आय अॅम द मॅन’ म्हणत, अश्लिल इशारे करायचा. त्यामुळेच एकदिवस मी त्याला वुमन पॉवर दाखवून दिला, असे फराहने सांगितले होते.
इतकेच नव्हे तर फराहबद्दल असेही म्हटले जाते की तिने पार्टी मध्ये एका निर्मात्याला चापट मारली होती. खरं तर, जेपी दत्ताच्या पार्टीत जेव्हा चित्रपट निर्माता फारूक नाडियाडवाला यांनी फराहला बिअर पिण्याची ऑफर दिली तेव्हा त्यांच्यात भांडण झाले होते.
पण करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना अचानक ती बॉलिवूडमधून गायब झाली. आज फराह कमालीची बदलली आहे. इतके की, तिला ओळखणेही कठीण व्हावे.
बिंदूनंतर फराहने अभिनेता सुमित सहगलशी लग्न केले. फराह पती आणि मुलासह मुंबईत राहते. फराह पहिल्यापेक्षा खूप बदलली आहे. त्यांची छायाचित्रे पाहून आपण अंदाज लावू शकता.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.