बॉलीवुडमधील सैफ अली खान आणि करीना कपूर यांच लग्न खरतरं ज्यावेळी पार पडलं, त्यावेळी देशभरात या लग्नाची प्रचंड चर्चा रंगली होती. मुलंबाळं असलेल्या आणि आधीच एक पत्नी असलेल्या सैफसोबत करीना कपूर का लग्न करत आहे, या प्रश्नाने अनेकांना पेचात पाडलं होतं. दुसरीकडे सैफच्या या लग्नाचे पडसाद केवळ इतर लोकांवर उमटले होते असं नाही. तर कौटुंबिक सहवासातही काहींना त्याच्या या लग्नाबाबतच्या गोष्टी पटल्या नव्हत्या. आणि खरतरं याचा खुलासा स्वत: खुद्द सैफची आई दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांनीच एका मुलाखतीदरम्यान केला होता. २०१२ या सालात हिंदी सिनेसृष्टीत अनेक चांगल्या गोष्टी घडत होत्या आणि वर्षात सैफ आणि करीनादेखील विवाहबंधनात अडकले.
या लग्नाचा जो काही सोहळा पार पडला त्यामधे केवळ कपूर आणि पटौडी कुटूंबच आनंदी होतं असं नाही तर तमाम बॉलीवुड जगतात दोघांच्या लग्नाची धुम गाजल्याची पहायला मिळाली होती. करीना आणि सैफ व दोघांच्या अगदी जवळची असणारी सारीच मंडळी या लग्नाबद्दल प्रचंड आनंदी आणि उत्साही असल्याचं पहायला मिळालं होतं. करीनाची उत्सुकता तर अगदी शिगेला पोहोचल्याची पहायला मिळत होती. सैफदेखील अगदी या लग्नासाठी जणू आतूर झाला होता. परंतु या लग्नात एक व्यक्ती जराशी नाराज आणि तितकिशी उत्साही नव्हती. ती व्यक्ती म्हणजे, सैफची आई आणि दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण हेच सत्य आहे. आणि याचा खुलासा खुद्द शर्मिला यांनीच केल्याचा पहायला मिळाला होता. चला तर मग आपण जाणून घेऊयात नेमकी अशी काय गोष्ट घडली होती की त्या नाराज होत्या?
आज बऱ्याच समारंभात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जेव्हा सैफचं कुटुंब जातं, तेव्हा शर्मिला टागोर या आपल्या सुनेचा अर्थात करीनाचा नेहमी आदरच करतात. एका रॉयल सासू-सुनेचा दर्जा शर्मिला नेहमी जपत असल्याचं अनेकदा पहायला मिळालं आहे. करीनादेखील आपल्या सासूचा अर्थात शर्मिला यांचा आदर नेहमीच करत आली आहे. लग्नाच्या काही दिवसांनंतर
आज दोघींमधे चांगला बॉन्ड तयार झाल्याचं पहायला मिळतं आहे. शर्मिला टागोर यांनी ज्यावेळी मुलाखतीत म्हटलं होतं की, या लग्नाला घेऊन त्या उत्सुक नाहीयेत. त्यावेळी त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता की, या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे? तेव्हा शर्मिला या स्पष्ट म्हटल्या होत्या की, मी माझ्या पतीच्या निधनाच्या गोष्टीने अजून तरी सावरलेली नाहीये, त्यांना आम्हाला सोडून जाऊन एक वर्षही नाही झालयं, तरी मुलाचं लग्न होतयं मी समाधानी आहे. त्यामुळेच या लग्नात मी अगदीच उत्सुक नसल्याची जाणवत असेल. सगळं कुटुंब आज आनंदित आहे, घरात लग्नसोहळ्याचा शुभमुहूर्त आहे तर ही बाब चांगलीच आहे.
एवढं बोलून त्यांनी नंतर मुलाखत संपवली होती. शर्मिला टागोर यांच्या पतीच्या निधनाने जो डोंगर त्यांच्यावर कोसळला होता त्याची तीव्रता आणि झळ केवळ त्यांनाच बसली होती असं नव्हतं, परंतु एक पत्नी असल्याने त्यांना प्रचंड आघात झाला होता हे निश्चित. त्यानंतर शर्मिला आणि करीना अनेकदा एकत्रित पहायला मिळाल्या. असं कधीच झालं नाही की, करिनासोबत लग्न झालयं म्हणून त्या दुखी होत्या अशी बाब नव्हती. परंतु त्यावेळी लग्नसोहळ्याची लगबग आणि दुसरीकडे प्रसारमाध्यमांमधे हीच चर्चा रंगली होती की, आई शर्मिलांची सैफच्या दुसर्या लग्नावर नाराजी आहे. परंतु या गोष्टींकडे सैफने दुर्लक्ष केलं होतं, कारण त्याला त्याच्या आईच्या दुखाच खरं कारण माहित होतं. आणि तो घरात आई व पत्नी करीना दोघींनाही एकत्रितरित्या जोडून ठेवण्याचं काम करत होताच.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!