बॉलीवुडमधील सिनेसृष्टीत एकापेक्षा एक विविध गोष्टी घडत असतात. आणि अनेकदा तर काही गोष्टी पुढे जातचं नाहीत. अर्थात काही असे व्यक्तिमत्व आपण पाहतो जे आजही बॉलीवुडमधे जीवणात यशस्वी झाल्यांनतरदेखील वैयक्तिक स्तरावर लग्न न करताही आज आयुष्य घालवत आहेत. याला कारण म्हणालं तर एक कारण असंही आहे की, हवा तो व्यक्ती आयुष्यात न आल्याने त्यांनी लग्न न करण्याचाच अंतीम निर्णय घेतला.
चला तर मग आपण अशा काही अभिनेत्रींबद्दल आता जाणून घेऊयात. या अभिनेत्रींनी मुळात विवाहीत पुरूषांवर प्रेम केलं आणि नंतर त्यांच्या पदरी निराशाच पडली. तर मुळात पहिली अभिनेत्री आहे नगमा. बॉलीवुडमधे सलमान खान याच्यासोबतीने लॉन्च झालेली अभिनेत्री म्हणजे नगमा. याच नगमाने मुळात आजही लग्न केलेलं नाहीये. नगमाची प्रसिद्धी सिनेसृष्टीत अफाट जोरावर होती.
नगमाचं नाव अनेकदा क्रिकेटपटू सौरभ गांगुली याच्यासोबत जोडल्या गेलं. परंतु गांगुलीच लग्न आधीच झालं होतं, याची कल्पना कदाचित नगमाला उशिराने कळाली. आणि पुढे नगमा आणि गांगुली कधीच एकत्र पाहिल्या गेले नाहीत. गांगुलीनंतर बऱ्याच काळानंतर नगमाचं नाव अभिनेता रवी किशन याच्यासोबतही जोडल्या गेलं परंतु तेदेखील नातं पुढं गेलं नाही.
यानंतर येणारी अभिनेत्री म्हणजे आशा पारेख. 70 च्या दशकात अगदीच तुफान प्रसिद्धीतील अभिनेत्री होत्या आशा पारेख. त्या आजतागायत अविवाहित राहिल्या आहेत. आशा पारेख या प्रेमातही पडल्या होत्या, परंतु गोष्टी म्हणाव्या तशा घडल्याच नाहीत. नासिर हुसैन यांच्याशी प्रेमात पडलेल्या आशा पारेख यांनी त्यांच्या लिहिलेल्या एका पुस्तकातही त्यांच नासिर हुसैन यांच्यावरच प्रेम व्यक्त केलं आहे. परंतू काही कारणास्तव दोघांच नात पुढे जाऊ शकलं नाही. आणि आशा पारेख यांनी एकटीने आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला.
आशा पारेख यांच्यानंतर येणारी अभिनेत्री म्हणजे, परवीन बाबी. सिनेसृष्टीतल्या ग्लॅमरसला वेगळी ओळख निर्माण केलेली आणि कायम आपल्या गॉर्जियस सौंदर्याने तमाम रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं ते याच परवीन बाबी यांनी. परवीन बाबींची तीन चार प्रेमप्रकरणे तुफान गाजली, अनेक काळ चर्चेतही राहिली परंतु शेवटी त्यांना अविवाहित रहावं लागलं.
त्यांच्या वाट्याला विवाहित पुरूषांवर झालेलं प्रेम आल्याने त्यांना हवा असलेला साथिदारच भेटला नाही आणि मग त्यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. परवीन बाबी या अशा अभिनेत्री होत्या ज्यांच्या नावानेच रसिकप्रेक्षकांच्या मनावर त्यांच्याबद्दल अगदी ओढ निर्माण व्हायची.
यानंतर येते ती सिनेसृष्टीतली सर्वांची लाडकी अभिनेत्री अर्थातचं तब्बू. तब्बू आजच्या घडीलादेखील तितक्याच जोमाने तिच्या भुमिकांमधून काम करत असल्याची पहायला मिळते. तब्बूने तिच्या तरूणकाळात जितके सिनेमे गाजवले, तितकेच ती आजदेखील गाजवते आहे.
नव्वदीच्या दशकात सतत टॉपला राहिलेल्या तब्बूला आज 50 वर्षांपेक्षा अधिक काळ होऊनही लग्न करता आलेलं नाही. असं म्हणतात की, तब्बू दाक्षिणात्य सिनेअभिनेता नागार्जुना याच्या प्रेमात ठार वेडी झाली होती. त्या काळात दोघांच्या रिलेशनशीपच्या गोष्टींनी अनेकांना धक्का दिला होता. परंतु नागार्जुना आधिच विवाहित होते, त्यामुळे दोघांच नातं पुढे जाऊ शकलं नाही.
यानंतर येते ती अभिनेत्री म्हणजे, सुष्मिता सेन. सुष्मिता सेन नुकतचं एका अगदी तरूण मुलाच्या प्रेमात पडल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण त्याआधी म्हटलं तर तिचं नाव सिनेसृष्टीत अनेकांसोबत जोडल्या गेलं. यात कलाकारांपासून ते थेट दिग्दर्शकांचा समावेश होता. परंतु मुळातच ती आजही अविवाहित राहीली आहे.
वैयक्तिक सुष्मिताने तरी आजवर एखाद्या नावाबाबत खास खुलासा कधीच केला नाही. तिने आज अविवाहित राहून दोन मुलींना दत्तकदेखील घेतलेलं आहे. ती एकटीनेच खंबीरपणे दोघींचा सांभाळ करत असल्याची दिसून येते. एकेकाळी सुष्मिताच्या अदाकारीने व सौंदर्याने अख्ख्या बॉलिवुडला भुरळ घातली होती.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!