या जगात जन्माला आलेल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की एक ना एक दिवस स्वतःच्या पैश्याचं हक्काचं घर असावं. आणि त्या घरात आपल्या हक्काचे माणसं राहायला हवी. तर हे फक्त सर्वसामान्य माणसाला नाहीतर सेलिब्रिटी लोकांना ही वाटतं.

त्यांना ही वाटतं की मोठं झाल्यावर आपण आपल्या कमावलेल्या पैशातून स्वतःचं एक घर खरेदी करावं. तर हिंदी मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिने नुकतंच नव्या वर्षात घर घेतलेलं आहे.

आता आपल्याला उत्सुकता लागलेली असेल की ती सेलिब्रिटी कोण ? तर आपण आता तीच माहिती सविस्तर रित्या घेणार आहोत. चला मग जाणून घेऊयात. की ती प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कोण ? एक अंदाज म्हणून ती एका प्रसिद्ध जेष्ठ बॉलिवूड अभिनेत्री ची मुलगी आहे. आता तरी येईल का अंदाजाचा पूल बांधता. नाही तर मग आम्ही आहोत. खालील सविस्तर लेख वाचा.

२०२१ हे नवीन वर्ष अनेक सेलिब्रिटींसाठी खास ठरत आहे. या नव्या वर्षात काही कलाकार विवाहबंधनात बांधले गेले आहेत. तर काही कलाकारांनी त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आलिया भट्ट, हृतिक रोशन, जान्हवी कपूर या सेलिब्रिटींनी घर खरेदी केल्याची चर्चा होती. त्यांच्या नंतर आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने नवीन घर खरेदी केलं आहे. तिचं घर कसं आहे ? काय आहे ? यावर आता आपल्याला उत्सुकता लागलेली आहे. तर चला जाणून घेऊयात.

कोणत्या नावाने घेतलं हेही माहीत करून घ्या. पिंकव्हिला’नुसार, सोनाक्षीने मुंबईतील वांद्रे येथे ४ बीएचके अपार्टमेंट खरेदी केलं आहे. वांद्र्यातील Bandra Reclamation या भागात सोनाक्षीने तिचं नवीन घर खरेदी केलं आहे. विशेष म्हणजे नव्या वर्षात माझं स्वप्न पूर्ण झालं असं सोनाक्षीने म्हटलं आहे. तिचा आनंद तिला किती झाला हे तिच्या पोस्ट वरूनच लावता येत आहे.

तिच्या पोस्ट मध्ये म्हणते की “जेव्हापासून मी करिअरला सुरुवात केली तेव्हापासून मी एकच स्वप्न पाहिलं होतं. वयाच्या ३० व्या वर्षापर्यंत मला माझं हक्काचं, स्वत:चं घर खरेदी करायचं होतं. आणि तेही आता पूर्ण झालं.

सोनाक्षी ने तिचं मन खूप मोकळ्या मनाने व्यक्त केलं. जे खूप भावुक होतं. मला माझ्या कष्टाच्याच पैशांमध्ये हे घर खरेदी करायचं होतं. तसं मला बराच वेळ लागला आहे. पण अखेरकार माझं स्वप्न साकार झालं आहे”, असं सोनाक्षी म्हणाली.

बरं एवढ्यावर ही ती थांबली नाही पुढे ती म्हणते, “मी नवीन घर जरी खरेदी केलं असलं तरीदेखील मी माझ्या आई-वडिलांसोबतच राहणार आहे. मला आई-वडिलांसोबत रहायला जास्त आवडतं. जुहूतील घर सोडून जाण्याचा माझा कोणताच विचार नाही. मला केवळ माझं हक्काचं घर खरेदी करायचं होतं.

ते मी केलं आहे आणि हीच माझी खरी गुंतवणूक आहे.” दरम्यान, सोनाक्षी लवकरच ‘भूज :द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अभिनता अजय देवगण तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

सोनाक्षी सिन्हा ही तर खूप लोकप्रिय अशी अभिनेत्री आहे. तिने आत्ता पर्यंत मोठं मोठ्या बॉलिवूड अभिनेते यांच्या सोबत स्क्रीन शेयर केलेली आहे. तर तिला तिने घेतलेल्या नव्या वर्षात ल्या नवीन घरा साठी खूप खूप शुभेच्छा.