काल सोशल मीडियावर आणि इतर न्यूज चॅनेल्स ला एकच चर्चा होती, की एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्या चं लग्न झालं. होय, एक प्रसिद्ध असा बॉलीवूड अभिनेता आहे ज्याने स्वतःचं लग्न लहानपणी असलेल्या मैत्रीण शी केलेला आहे.

आणि हा त्यांचा प्रेमविवाह आहे. तर आपल्याला प्रश्न पडला असेल की त्या जोडीचं नाव काय ? अहो वरून धवण आणि नताशा. होय त्यांनी लग्न केलं आणि त्यांचे लग्नाचे फोटो जी व्हायरल झाले ते झाले. चला तर मग त्यांचे फोटो पाहुयात.

कलाविश्वातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरलेला अभिनेता वरुण धवनचा विवाहसोहळा अखेर संपन्न झाला आहे. वरुणने त्याची प्रेयसी नताशा दलालसोबत लग्नगाठ बांधली आहे. २२ जानेवारीपासून यांच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली होती आणि आज अखेर या दोघांनी साताजन्माची गाठ बांधली आहे. सध्या सोशल मीडियावर या सोहळ्यातील काही फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

अलिबाग येथील द मेन्शन हाऊस येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती हा लग्नसोहळा पार पडला. काही वेळापूर्वीच वरुण-नताशाच्या संगीत सोहळ्याचे फोटो समोर आले होते.त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यानंतर आता या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

अगदी मोजक्या पाहुण्यांनाच या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. या लग्नसोहळ्यात केवळ ५० जणांनाच आमंत्रण देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच सुरक्षेची अत्यंत कडेकोट व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यात मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली होती.

याच दरम्यान, या लग्नसोहळ्यात कलाविश्वातील दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. यात करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, कतरिना कैफ, कियारा आडवाणी, अनिल कपूर, जान्हवी कपूर असे अनेक दिग्गज सहभागी झाले होते.

वरून धवन आणि नताशा हे दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. आता त्यांनी वैवाहिक जीवनाची योग्य वेळी चांगली सुरुवात केली आहे. नवं वर्षे त्यांच्या साठी खूप सुख समाधान घेऊन यावं हीच ईश्वर चरणी पार्थना. आणि स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.