कियारा अडवाणी ही अभिनेत्री गेल्या काही वर्षात बरीचशी चर्चेत राहिली आहे. शिवाय तिच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बऱ्याचदा चांगली कमाईदेखील केल्याची पहायला मिळते. कियारा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बरीच सक्रीय राहते. आणि तिच्या बाबतीत तिचा चाहतावर्गदेखील तिच्या हरएक गोष्टीवर नजर ठेवून असतो. कियारा सध्या तिच्या एका जबरदस्त खुलाशामुळे प्रकाशझोतात येत असल्याची पहायला मिळते.
कियाराने तिच्या खासगी आयुष्याबाबत ही गोष्ट सांगितली आहे. आणि ती गोष्ट म्हणजे, ती कोणालातरी डेट करत आहे. तिने याबाबत नेमक्या नावाचा खुलासा केलेला नाही. परंतु ती म्हणाली आहे की, माझ्या बॉयफ्रेंडसोबत मी सध्या डेटवर जाणं पसंत करते आहे. तिने खरतरं ही गोष्ट एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे.
आणि यासोबतच ती म्हणते की, जर तिच्या बॉ’य’फ्रें’ड’कडून तिला फ’स’व’ण्या’त आले तर ती त्याला कायमची ब्लॉ’कही करून टाकेल. कियारा तिच्या रिलेशनशीपबाबत बरीच उत्सुक आणि आनंदी पहायला मिळते आहे. कियाराने मुलाखतीदरम्यान हेदेखील सांगितलं आहे की, “आम्ही दोघे एकमेकांना गेल्या दोन महिन्यांपासून डेट करत आहोत. आणि गेल्या आठवड्याभरातचं आम्ही पुन्हा एकदा डेटवर गेलो होतो.”
मुळात कियाराने ज्या गोष्टी विना नाव घेता स्पेसिफिक पद्धतीने सांगितल्या त्यावरून सध्यातरी तिचं अफेअर सिद्धार्थ मल्होत्रा अभिनेत्यासोबत चालू झालं असल्याची शक्यता भरपूर आहे. सिद्धार्थ आणि कियारा दोघेही गेल्या काही दिवसांमधे एकत्रीत स्पॉट करण्यात आले आहेत. दोघांचही एखाद्या प्रोजेक्टशिवाय एकत्र येणं, भेटणं आणि दुसरीकडे कियाराचं डेटबाबत स्पष्टीकरण देणं; या सर्व जुळून येणाऱ्या घटना हे सांगू शकतात की, कियारा अडवाणी ही अभिनेत्री थेट सिद्धार्थ मल्होत्रा या अभिनेत्याला डेट करत आहे. सिद्धार्थ सध्या रश्मिका मंडन्ना हिच्यासोबत आगामी सिनेमाच्या शुटींगमधे व्यस्त असल्याची माहिती मिळाली आहे. आणि तरीदेखील तो व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून जर कियारा सोबत दिसत असेल तर हे नक्कीच स्पेशल आहे.
मालदीव वरून काही दिवसांपूर्वी कियारा मुंबईत परतल्यानंतर ती एकदोन वेळा सिद्धार्थच्या घरी त्याच्या आई-बाबांनाही भेटली होती. कियारा हल्ली अनेकदा सिद्धार्थच्या घराजवळ त्याला भेटण्यासाठी जात असल्याचीही पाहण्यात आली आहे. कियारा तिच्या प्रेमाला, रिलेशनशीपला घेऊन बरीच सिरियस झाल्याची हल्ली पहायला मिळते आहे.
कियारा तिच्या डेटिंगच्या चर्चांनी सध्या बरीच गाजत आहे. कियाराच्या चाहत्यांच्या मनात या नात्याबद्दल सध्या चांगलीच कुजबुज सुरू झाली आहे. तिच्या चाहत्यांना सिद्धार्थ – कियारा ही जोडी नक्कीच रिलेशनशीपमधे आलेली आवडेल. कियारा अडवाणी लस्ट स्टोरीज, एम एस धोनी, इंदू की जवानी, गिल्टी यांसारख्या प्रोजेक्टमधून पडद्यावर झळकली आहे. कियारा अनेक इंटरनेट ओटीटी प्लॅटफॉर्मवरूनही रसिकप्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
कियारा आजवर केवळ हिंदी सिनेसृष्टीतल्याच कंटेंटवर काम करत पुढे आली आहे असं नाही. तर मुळात तिने दाक्षिणात्य सिनेमातही काम केलेलं आहे. तिने तिथेही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा याच्याबाबत बोलायचं म्हटलं तर याआधी त्याच्या रिलेशनशीपच्या चर्चा कॅटरिना कैफ, आलिया भट, जॅकलिन यांसारख्या अभिनेत्रींसोबत झालेल्या आहेत. परंतु सिद्धार्थ कधीच त्याच्या कोणत्याही रिलेशनशीपबाबत स्पष्टपणे बोलताना पहायला मिळाला नाही. एक व्हिलन, इत्तफाक, स्टुडंट ऑफ द इयर, कपुर ॲण्ड सन्स यांसारख्या चांगल्या सिनेमांमधून तो रसिकप्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या वाट्याला नेहमीच प्रोजेक्ट्स येत राहिले आणि तो आपलं काम बखुबीने करत राहिला आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!