रोमॅन्टिक सिनच्या वेळी शाहरूखने काजोलसोबत केली होती अशी हरकत, काजोल अगदीच चकीत झाली होती!

बॉलिवुडमधील सिनेकलाकारांच्या अनेक जोड्या आजवर पडद्यावर गाजल्या आहेत. त्यांपैकी एक सर्वात खास आणि विशेष जोडी म्हणजे बॉलीवुडमधील किंग खान शाहरूख खान आणि अभिनेत्री काजोल. एक काळ दोघांची पडद्यावरील जोडी पाहून अनेकांना दोघे नवरा बायकोच आहेत की काय हा प्रश्नदेखील पडत असायचा. काजोल आणि शाहरुख खान या दोघांनी हिंदी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार सिनेमे दिले आहेत. त्यांच्या जोडीने हिंदी सिनेमाला दिलेलं योगदान नेहमीच कायम इतरांच्या लक्षात राहण्यासारख आहे, हे निश्चित. अनेक एकत्रित सिनेमे केलेली ही जोडी सर्वात पहिल्यांदा बाझीगर मधून पडद्यावर आली होती. आणि या सिनेमात एका रोमॅन्टिक सिनला शाहरूखने चक्क अशी काही गोष्ट केली होती की ज्यामुळे काजोल पुर्णत: आश्चर्यचकीत झाली होती.

रोमॅन्टिक सिनच्या दरम्यान काजोलला जे भाव द्यायचे होते तिला ते देणं जमत नव्हतं, काय करता येईल असा प्रश्न अनेकांना पडला होता, सिन रिटेक शुट होत असताना त्या हावभावांना चेहर्‍यावर येण्याकरता चालू सिनच्या टायमिंगला मॅच करत शाहरूखने तिला चक्क चिमटा काढला आणि तिच्याकडून या अचानक घडलेल्या गोष्टीमुळे चेहऱ्यावर हवे ते भाव उमटल्या गेले आणि तो सिन योग्यरित्या शुट झाला. काजोलसाठी हे जरा चकित करणारं ठरलं, सिन डन झाल्याने ती मात्र खुशीत होती. काजोलने तिच्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाउंटवर मागे आस्क मी अनीथिंग हा सेशन घेतल्यावर चाहत्यांकडून तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते, त्यात शाहरूख सोबत पुन्हा कधी काम करणार या प्रश्नावर याच उत्तर शाहरूखलाच माहिती असेलं असं ती म्हणाली होती. शाहरुख खान आणि काजोल दोघे एकमेकांचे किती घनिष्ठ मित्र आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांची केवळ ऑनस्क्रीन बॉन्डींग नाही तर ऑफस्क्रीन खऱ्या आयुष्यातील बॉन्डींगदेखील चांगलीच आहे.

काजोलने तिचे शाहरूख खान याच्यासोबतच्या शुटिंगचे बरेच किस्से आजवर शेअर केले आहेत. काजोल सहसा तिच्या कामाबद्दल अथवा तिने केलेल्या सहकलाकाराबद्दल क्वचितच बोलताना आढळते परंतु शाहरूख खान याच्यासोबतच्या गमतीजमती ती अगदी बिनधास्तपणे शेअर करत असल्याचीही पहायला मिळते. शाहरुख आयुष्यभरासाठी एक मित्र म्हणून खुप चांगला व्यक्ती आहेच शिवाय तो एक आयकॉनिक स्टार आहे, असंही काजोल म्हणते. नव्वदच्या काळात काजोल आणि शाहरुख सिनेमात असतील तर सिनेमा सुपरहीट होणारच अशी स्थिती होती. दोघांनी आजवर एकत्र “करण-अर्जून”, “दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे”, “कुछ कुछ होता है”, “कभी खुशी कभी गम”, “बाझीगर”, “दिलवाले” असे सिनेमे केलेले पहायला मिळतात. काजोल आणि शाहरुख दोघेही एकमेकांना चांगले ओळखतात, काजोलला एकदा एका चाहत्याने चक्क, तुमचं अजय सोबत लग्न झालं नसतं तर तुम्ही शाहरूख सोबत लग्न केलं असतं का? असा प्रश्न विचारला होता.

त्यावर काजोल एवढंच म्हणाली होती की, त्याने मला प्रपोजच केलं नसतं. त्यामुळे लग्नची गोष्ट झालीच नसती. काजोलने जो शाहरूखच्या शुटवरील हरकतीचा किस्सा सांगितला आहे, त्याचं खरतरं तिथे सरोज खानही त्यावेळी उपस्थित होत्या. आणि सरोज खान यांनीच शाहरूख खानला तिला चिमटा काढून तिच्याकडून ते हावभाव काढून घेण्याची आयडिया सुचवली होती, हे शाहरूखने स्वत: सांगितलं होतं. शाहरुख म्हणतो, हा किस्सा ऐकायला जरी थोडा विचित्र वाटत असला तरी त्याच विचित्र वाटण्यासारखं खास काहीच नाहीये. त्याचा मुद्दाही योग्यच होता, कलाकारांकडून कधीकधी काम काढून घेण्याकरता काहीतरी विचित्र गोष्टी कराव्या लागतात, एकदा अजय देवगणनेही असं केल्याच काजोलने एका कार्यक्रमात सांगितलं होतं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!