बॉलीवुडमधील कलाकार आणि क्रिकेटर्स यांच नातं काही जुनं नाही, अगदी बऱ्याच काळापासून कलाकार आणि क्रिकेटर्स यांच्यामधे प्रेमसंबंध प्रस्थापित झालेले पहायला मिळतात. तर मुळात आज आपण ज्या दोघांबद्दल बोलणार आहोत, ते दोघेही आज आपापल्या क्षेत्रातील उत्कृष्ट व्यक्तिमत्वे आहेत.
सर्वात पहिलं म्हणजे, बॉलीवुडमधील कलाकार आणि क्रिकेटर्स यांची काहीच नाती पुर्णत्वाला गेली तर अनेक नाती ही अर्ध्यावर संपुष्टात आली. आणि या संपुष्टात येणाऱ्या नात्यांपैकी एक म्हणजे, दिपीका पादुकोन आणि युवराज सिंग. अनेकदा या दोघांच्या नात्याच्या वावड्या उठल्या, मिडीयाने प्रचंड प्रमाणात या दोघांच्या प्रेमप्रकरणांच्या गोष्टी व्हायरलं केल्या, अनेकांनी याला खोटदेखील ठरवलं होतं.
परंतु ज्यावेळी खुद्द युवराज सिंग याबाबत बोलला तेव्हा सर्वांना खात्री पटली की, युवराज दिपीका काही काळ एकत्र राहिले होते. खरतरं तसं पाहता हिंदी सिनेसृष्टी म्हटलं की इथे अभिनेत्रींची प्रेमप्रकरणे सर्वात आधी प्रकाशझोतात येतात आणि ती सोशल मीडियाचा चर्चेचा विषय होऊन बसतात.
युवराजसोबत असलेल्या नात्याचं दिपीकाचही काहीसं असचं झाल्याचं पहायला मिळालं होतं. एक काळ होता ज्यावेळी दिपीका भारताचा अष्टपैलू क्रिकेटर युवराज सिंग याला डेट करत होती. पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी वर्ल्ड कपच्या दरम्यान दोघांची पहिली भेट झाली होती. आणि तिथुनच दोघांच्या प्रेमप्रकरणाची सुरूवात झाल्याची कळते. दोघांमधे कॉमन असलेल्या एका मित्राच्या माध्यमातून दोघांची पहिली भेट झाल्याची माहिती आहे.
दोघे एकत्र आले, त्यांच्यात अगदी कमी काळात जवळीकता निर्माण झाली. चांगली मैत्री निभावता निभावता दोघेही प्रेमात पडले. परंतु काही ठराविक काळ एकमेकांना डेट केल्यानंतर गोष्टी बदलल्या आणि दोघांचही अगदी अल्प कालावधीत ब्रेक-अप झालं. क्रिकेटपटू युवराज सिंग याचा स्वभाव फार मोकळा आहे हे सर्वांना ठाऊकच आहे.
त्याच्याकडे एखाद्या गोष्टीचा खुलासा विचारला तर तो लागलीच त्याची खरी कहाणी सांगून मोकळा होता. असंच काहीसं युवराजने एका मुलाखतीदरम्यान केलं. या मुलाखतीत ज्यावेळी दिपीकाचा विषय समोर आला, तेव्हा युवराजने फार आढेवेढे न घेता खरी गोष्ट सांगून टाकली. युवराज म्हणाला की, मी त्यावेळी परदेशातून नुकताच भारतात आलो होतो. आणि मला काही गोष्टींकरता थोडा वेळ लागणार होता.
माझा विचार होता की, दिपीका आणि मी दोघांनी खुप कमी वेळ एकत्र घालवला आहे तर तो वेळ थोडा अधिक पाहिजे, आम्ही एकमेकांना व्यवस्थित जाणून घेतलं पाहिजे. तिचंही हेच म्हणणं होतं. पण नंतर आम्ही एकमेकांना पुरेसा वेळ देऊच शकलो नाही, काळानुसार ती पुढे गेली आणि मीही वेगळ्या मार्गाला लागलो. त्यावेळी खरतरं युवराजला थोड्या दिवसात दिपीका रणबीरसोबत असल्याचं समजलं होतं, ज्यामुळे युवराजने त्याच पाऊलं पुन्हा दिपीकाकडे वळवलं नाही.
तो यावेळी हेही म्हणाला की, ती आज इतर कोणासोबत जर आनंदी आहे तर ते ठीक आहे, तो तिचा वैयक्तिक निर्णय आहे. भारतीय क्रिकेटचा वर्ल्ड कपच्या दरम्यान अगदी महत्वपूर्ण पैलू ठरलेला युवराज आज त्याचं आयुष्य पत्नी हेजल सोबत व्यवस्थितरित्या आयुष्य जगत आहे. दुसरीकडे दिपीका पादुकोन आणि रणवीर सिंह हेदेखील विवाहबद्ध होऊन एकत्र आयुष्य जगत आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!