मित्रांनो!, आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात क्षेत्र कुठेही असले तरी सर्वच क्षेत्रातील तणाव मात्र अतिशय वाढला आहे. आत्मविश्वास ढासळतोय, वाढत्या तणावातून कामाचा आनंद मिळत नाही. वाढत्या स्पर्धेमूळे कामही वाढत आहे आणि त्यातून येते नैराश्य. मग यातून सुटका करून घेण्यासाठी अनेक जण व्यसनांच्या आहारी जातात.
बॉलिवूडबद्दल तर काही बोलायलाच नको. या क्षेत्रातील सगळेच कलाकार तणावग्रस्त आयुष्य जगत आहेत. दिवसेंदिवस युवा मंडळी या क्षेत्राकडे वळू लागल्याने स्पर्धा वाढतच चालली आहे. अशा परिस्थितीत या फ्रस्ट्रेशन, मानसिक ओढताणीतून सुटका करून घेण्यासाठी मग दारूचा आधार घेतला जातो.
फक्त अभिनेतेच नव्हे तर अश्या अनेक अभिनेत्र्या देखील आहेत ज्या पूर्णतः दारूच्या आहारी गेल्या आहेत. अशाच काही बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींबद्दल हा लेख आहे, ज्या दारूच्या सवयीने ग्रस्त आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, त्यांचा दिवस दारूच्या पेग ने सुरू होतो नी रात्र संपते ती पण चार पेग मारूनच. जाणून घेऊ या.
अमिषा पटेल : या यादीत पहिले नाव अमीषा पटेल यांचे आहे जी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने लाखो अंतःकरणावर राज्य करणारी बॉलीवूड अभिनेत्री आहे. अमिषा ही कायमच आपल्या तोकड्या कपड्यांमुळे अनेकदा चर्चेचा विषय असते. इतकेच नव्हे तर अनेक वेळा असे घडते की अमीषा तिच्या कपड्यांव्यतिरिक्त आणखी एक वाईट व्यसनामुळे चर्चेत राहते, ते म्हणजे दारूचे व्यसन.
एक काळ होता अमिषा पटेल ही बॉलिवूड मध्ये अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री होती. कहो ना प्यार है, गदर सारख्या चित्रपटांनंतर ती आपल्या करिअरच्या शिखरावर होती. परंतु हळू हळू तिला ऑफर्स कमी येऊ लागल्या. आणि हेच एक कारण आहे ज्यामुळे ती दारूच्या आहारी जाऊ लागली.
मनीषा कोईराला: तुम्हाला माहिती असेलच की मनीषा कोईराला कर्क-रो-गासारख्या गंभीर आजाराशी झगडत होती आणि या आजारावर मोठ्या हिमतीने मात केली आहे. पण तुम्हाला माहिती नसेल की मनीषा कोईरालासुद्धा एका वेळी दारूच्या व्यसनात अडकली होती म्हणून ती कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने बळी पडली होती. पहिल्या घटस्फोटानंतर नंतर मनीषा कोइरालाने खूप दारू पिण्यास सुरवात केली होती.
सुष्मीता सेन : एकेकाळी मिस यूनिव्हर्स म्हणून नावाजलेली सुष्मीता सेन आज मात्र पूर्णपणे दा रू च्या आहारी गेली आहे. नुकतेच सुष्मिता सेनने दोन मुलांना दत्तक घेतले होते, त्यामुळे ती चर्चेत आली होती. परंतु तिच्या जवळची लोकं आणि मीडिया सूत्रानुसार बातमी आहे की सुष्मिता सेनचे दारूचे व्यसन वाढतच आहे. इतके की जसे आपल्याकडे सामान्यतः सकाळचा चहा लागतो, तशीच तिला सकाळी दारू हवीच.
राखी गुलजार: या यादीमध्ये बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्री राखीचेही नाव आहे, जी एकेकाळी आपल्या जिवंत अभिनयाच्या जोरावर लाखो रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असे. परंतु मीडियाच्या वृत्तानुसार सांप्रत काळात राखीलाही दारू पिण्याची वाईट सवय लागली आहे. राखीला तिच्या कारकीर्दी मध्ये आपण अगदीच सोज्वळ रोल करताना बघितले आहे. त्यामुळे तिला अगदीच सभ्य समजले जात होते. परंतु प्रत्यक्षात मात्र राखी अगदीच विरुद्ध आहे. आजकाल राखीची सकाळ दारूपासून सुरू होऊन, रात्र दारूनेच संपते.