इमरान हाश्मीवर नाराज झाली होती ऐश्वर्या राय, पहा नेमका काय घडला होता हा किस्सा!

बॉलीवुडमधील सिनेसृष्टीत अनेकदा अनेक प्रकार घडल्याचे आपल्या समोर येत असतात. बॉलिवूडमधे कधीकधी तर कलाकारांचे एकमेकांसोबत वादही होत असतात. आणि या वादांना अनेकदा वेगवेगळे रंग प्राप्त होतात. आपल्याला असचं एक वादाचं गाजलेलं प्रकरण माहित आहे तर ते म्हणजे, अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान यांच्यामधलं. परंतु इथे एक गोष्ट अशी आहे ती म्हणजे, ऐश्वर्या राय हिचा एकदा चक्क बॉलीवुडमधील सिरीयल किसर म्हणून ओळख असणाऱ्या इमरान हाश्मीसोबतही वाद झाला होता. आणि या वादानंतर चक्क इमरान हाश्मी याला माफीदेखील मागावी लागली होती. जवळपास २०१४ सालात ही गोष्ट घडली होती. अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या सौंदर्याबाबत तमाम बॉलीवुडचं नाही तर तमाम जग सारकाही जाणून आहे.

तिने आपल्या सौंदर्याच्या जोरावर मिस युनिव्हर्सचा खिताबही पटकावला होता आणि शिवाय तिने याच सौंदर्याच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाची छाप भारतीय सिनेमाक्षेत्रात उमटवली आहे. आणि मुळात कित्येकांना अनेकदा आपल्या सौंदर्याने, अदांनी लाखो करोडो चाहत्यांना घायाळ करणाऱ्या या ऐश्वर्याची एकदा इमरान हाश्मीने मस्करी केली होती. ऐश्वर्या अगदी तिच्या डोळ्यांपासून ते तिच्या नितळ त्वचेपर्यंत किती सुंदर आहे याची प्रचिती आज तमाम जगाला आलेली आहे. आजवर बॉलीवुडच्या सिनेसृष्टीत अनेक एकापेक्षा एक भन्नाट हिट सिनेमेदेखील तिने दिले आहेत. दुसरीकडे बॉलीवुडमधील सिरियल किसर आणि आपल्या अभिनयाची अगदी सहजतेने रसिकप्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवणारा इमरान हाश्मी. याच इमरान हाश्मीने चक्क ऐश्वर्याला प्लॅस्टिक सारखी दिसते असं म्हटल्यानंतर ऐश्वर्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली नसती तर नवलचं.

सिनेसृष्टीत मर्डर, राज, जन्नत, कलयुग यांसारख्या दर्जेदार सिनेमांना खुलवलं ते इमरान हाश्मी याच्या अभिनयानेच. तर मुळात आता आपण जाणून घेऊयात की, इमरान हाश्मी या अभिनेत्याचा आणि ऐश्वर्या राय हिचा हा नेमका किस्सा काय घडला होता? तर गोष्ट अशी झाली होती की, एका मुलाखतीदरम्यान इमरान हाश्मी याला काही प्रश्नोत्तरे द्यायची होती. आणि त्याला पटापट उत्तर द्यायची होती. समोर अप अशी होती की, एखाद्या व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर मनात सगळ्यात पहिले त्याच्याबद्दल कोणता विचार येतो? आणि मग इमरान हाश्मी याची ही मुलाखत चांगल्या वळणाला रंगली होती. त्याच्यासमोर ऐश्वर्या रायचं नाव घेण्यात आलं आणि तो क्षणार्धात प्लॅस्टिक म्हणून मोकळा झाला.

खरतरं या बाबीमुळे ऐश्वर्या प्रचंड चिडली होती, कारण या मुलाखतीतील हा किस्सा सोशल मीडियावर प्रचंड रंगला होता, शिवाय यामुळे अनेकांनी ऐश्वर्याच्या नैसर्गिक सौंदर्यावर प्रश्नचिन्हे उपस्थित केलेली होती. आणि हे सगळं घडून गेल्यानंतर बच्चन कुटूंबाने इमारान हाश्मी यासोबच थोडासा दुरावाही निर्माण केला होता, परंतु इमरान हाश्मीने माफी मागताच ते रूसवेफुगवे निघून गेले. आणि आता विषेश बाब म्हणजे, “चेहरे” या सिनेमातून इमरान हाश्मी ऐश्वर्याचे सासरे अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकताना पहायला मिळणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाल्यानंतर प्रेक्षकांची या सिनेमाकडे चांगलीच उत्सुकता लागल्याची पहायला मिळते आहे. मुळात ऐश्वर्या राय आणि इमरान हाश्मी यांच्यात घडलेल्या याच मुलाखतीच्या किस्यात आमिरचं नाव घेतल्यावर बोरिंग असा शब्द उच्चारला होता, परंतु दिलदार स्वभावाचा आमिर मात्र अजिबात नाराज नव्हता; हे विशेष.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!