बॉलीवुडमधील रणबीर कपूर एकमेव असा अभिनेता कदाचित असू शकेल ज्याने आपल्या आजवरच्या कमी कारकिर्दीत कितीतरी नामांकित अभिनेत्रींना डेट केलं असेलं. बॉलिवूड विश्वातला चॉकलेट बॉय समजला जाणारा आणि चक्क स्वत:ची कॅसोनोव्हा म्हणून टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या रणबीरने आजवर कितीतरी अभिनेत्रींना अगदी सहजरित्या आपल्या इशाऱ्यांवर फिरवलं आहे, असं म्हटल्या जाऊ शकतं.
कारण रणबीर कपूर या अभिनेत्याच्या गर्लफ्रेंड्सची लिस्ट फारच मोठी आहे. या लिस्टमधे अनेक नामांकित अभिनेत्रींचा समावेश झालेला पहायला तर मिळतोच पण मुळात एक काळ असा होता ज्यावेळी रणबीर एकाच वेळी दोन अभिनेत्रींना एकसोबत डेट करत होता. आणि दोन्ही अभिनेत्रींना याची खबरही लवकर लागली नव्हती. सोनम कपूर, दिपीका, कॅटरिना, अलीकडे आलिया भट यांसारख्या अभिनेत्र्या रणबीरच्या प्रेमात अक्षरशः वेड्या होत्या.
तुमचा विश्वास बसणार नाही परंतु आपल्या कारकीर्दीच्या सुरूवातीलाच “सांवरिया” सिनेमातल्या सोनमला डेट करून झाल्यानंतर रणबीर लगोलग त्वरीत दिपीकाच्या संपर्कात आला. आणि त्याच दिपीकावर प्रेम जडलं. मग तो दिपीकाला डेटवर घेऊन जाऊ लागला. दोघांच्या नात्यांच्या चर्चांना प्रसारमाध्यमांमधे त्यावेळी चांगलच उधाण आलं होतं. हा काळ जवळपास २००७ च्या दरम्यानचा होता.
दिपीकावर रणबीरची खुमारी इतकी चढली होती की तिने आपल्या शरीरावर रणबीरच्या नावाचा टॅटूदेखील बनवला होता. हळूहळू काही दिवस गेल्यानंतर रणबीरच्या संपर्कात कॅटरिना कैफ आली. कॅटरिनावर रणबीर फिदा झाला. आणि दिपीकासोबतही तो यादरम्यान डेटींग करत राहिला होता. दिपीकाने कॅटरिनासोबत रणबीरला रंगे हात पकडले होते.
दिपीकाने रणबीरला रंगे हात पकडलं आणि दोघांच ब्रेक अप झालं. दोघांचही ब्रेक अप झाल्याने रणबीरला कॅटरिनासोबत डेट करण्यास एकप्रकारे चांगलीच मोकळीक मिळाली. आणि मग पुढे दोघांच्या प्रेमाची कहानी सर्वांना माहितच आहे. रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ जवळपास लग्नबंधनात अडकणार होतेच परंतु रणबीरच्या आईने लग्नाला नकार दिला.
दोघे अनेक वर्ष एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमधेदेखील राहिले होते. “अजब प्रेम की गजब कहानी” या सिनेमापासूनच दोघांच्या केमिस्ट्रीची खरी सुरूवात झाली होती, असं म्हणता येईल. कॅटरिना तिच्या आयुष्याच्या एका टप्प्यावर लग्न करून सेट होण्याच्या तयारीत होती. तिने रणबीर कपूर सोबतच्या नात्यात बराच पुढाकार स्वतःहून घेतला होता.
कॅटरिनाने अनेकदा रणबीरच्या आईचीदेखील मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पुढे गोष्टी सार्थकी लागल्या नाहीत. शेवटी कॅटरिना कैफला रणबीर कपूर सोबत ब्रेकअप करावचं लागलं. सध्याच्या घडीला कॅटरिना अजूनही विना कोणाच्या प्रेमात पडता तिचं आयुष्य चांगल्या पद्धतीने घालवताना पहायला मिळते आहे.
दुसरीकडे दिपीकाच्या बाबतीत म्हणालं तर तिने रणवीर सिंह याच्यासोबत विवाह केला आहे. आणि चॉकलेट बॉय रणबीर कपूरचं म्हणालं तर, तर तो पुन्हा एकदा नव्या रिलेशनशीपमधे बिझी आहे. अर्थातचं आलिया भट आणि रणबीर आता एकत्र आले आहेत. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमातील सोहळ्याच्या दरम्यान आलियाने सर्वांसमक्ष रणबीरला प्रपोजदेखील केल्याचं पहायला मिळालं होतं.
रणबीर कदाचित एकदाचा आलिया भट हिच्यासोबत लग्न करण्याच्या तयारीत असल्याचा पहायला मिळतं आहे. त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, लॉकडाऊन जर पडलं नसतं तर कदाचित दोघांच लग्न झालं असतं. आता महत्त्वाची बाब म्हणजे, दोघे कधी लग्नबंधनात अडकणार हे निश्चित सांगता येणं कठीणच आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट दोघेही एकत्र पहिल्यांदाच “ब्रम्हास्त्र” या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!