फॅशनच्या बाबतीत सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या काही ठराविक गोष्टींपैकी एक म्हणजे सिनेसृष्टी. कारण या सिनेसृष्टीत बऱ्याच गोष्टीमंधे फॅशन डिझायनिंग ही गोष्ट चालल्याची पहायला मिळते. अनेक अभिनेत्र्या तसेच अनेकदा अनेक अभिनेते त्यांच्या कपड्यांना घेऊन विविध फॅशन सेन्समुळे चर्चेत येत राहतात.

अनेकदा त्यांच्या फॅशनला त्यांचा चाहतावर्गदेखील फॉलो करत असल्याच आपल्याला पहायला मिळालं आहे. त्यामुळे फॅशन इंडस्ट्रीज एकप्रकारे सिनेसृष्टीसोबत करार करून चालत असल्याप्रमाणेच चालत राहतात. बॉलीवुडमधील अभिनेत्र्या त्यांचा ग्लॅम आणि स्टाईलचा अंदाज मात्र फारच जबरदस्त ठेवत असल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे.

अनेक अभिनेत्र्या त्यांच्या पडद्यावरील कपड्यांच्या निवडीमुळेच नाही तर खऱ्या आयुष्यात कार्यक्रमादरम्यान परिधान करत असलेल्या कपड्यांच्या निवडीमुळेही प्रसिद्धी माध्यमांचा विषय बनून राहतात. आणि चाहत्यांना त्यांच्या कपड्यांच्या, राहणीमानाच्या बाबतीत बरीचशी उत्सुकता कायम मनात दाटून राहिलेली पहायला मिळते.

फॅशनच्या बाबतीत विषय आल्यावर काही अभिनेत्री करोडो रुपयांचा खर्चा करायलाही मागे पुढे पाहत नाहीत, चला तर मग पाहुयात अशाच काही अभिनेत्रींच्या फॅशनविषयी. सर्वात पहिले बोलायचं झालं तर प्रियंका चोपरा. प्रियंका खरतरं ग्लोबल फॅशन आयकॉन बनलेली आहे असं म्हणावं लागेल. ती जेव्हा जेव्हा रेड कार्पेटवर एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी उतरली आहे तेव्हा तेव्हा तिच्या फॅशनची चर्चा सर्वत्र झाली आहे.

ग्रॅमी अवाॅर्ड्स २०२० मधे ती व्हाईट गाऊनमधे जेव्हा रेड कार्पेटवर आली होती तेव्हा तिच्या या फॅशनची चर्चा तुफान प्रमाणात रंगल्याची पहायला मिळाली होती. तुमचा विश्वास बसणार नाही परंतु या कपड्याची किंमत चक्क ७७ लाख रुपये एवढी होती. डायमंड आणि भरजरी जरीकिनार असलेल्या या पांढऱ्या रंगाच्या गाऊनमधे प्रियंकाच सौंदर्य प्रचंड प्रमाणात खुलून दिसत होतं.

आता दिपिका पादुकोन हिच्याबद्दल बोलायचं म्हटल्यावर तिच्या फॅशनची खासियत फारच गजब राहिली आहे. भारतीय असो, पाश्चिमात्य असो वा इतर कुठला परिधान केलेला लहेजा असो तो दिपिकावर प्रचंड प्रमाणात खुलून दिसतो. २०१९ सालच्या मेट गाला अवॉर्ड्स कार्यक्रमात दिपीका सर्वाधिक महागड्या फॅशन करून आलेली पहायला मिळाली होती.

गुलाबी रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन तिने परीधान केलेला पहायला मिळाला होता आणि त्याची किंमत तब्बल ५० लाख ५० हजारांच्या आसपास होती. दिपीकाच्या या भरजरी गाऊनला बनवण्यासाठी तब्बल १६० तासांचा अवधी लागला होता.

दिपिका नंतर येणारी अभिनेत्री म्हणजे उर्वशी रौतेला. उर्वशीला अनेक महागड्या आणि डिझायनर कपड्यांची आवड असल्याची बऱ्याचदा पहायला मिळाली आहे. तुम्ही कदाचित ही बाब ऐकुन निश्चितच आश्चर्यचकित व्हालं परंतु उर्वशी तिच्या एका शूटवर 37 कोटींच्या ड्रेसमधे पोहोचली होती.

दुबईत शुटवर गेलेल्या उर्वशीचा हा ड्रेस संपूर्णपणे शुद्ध सोन्याचा बनलेला पहायला मिळाला होता. याशिवाय उर्वशीने नेहा कक्कर हिच्या लग्नातही प्रचंड महागड्या डिझायन असलेल्या कपड्याला अंगावर परिधान केल्याचं पहायला मिळालं होतं. तिने यावेळी 55 लाखांपेक्षा अधिक किमतीचा लेहंगा अंगावर परिधान केला होता. विशेष म्हणजे या वेशभूषेतल्या तिच्या सौंदर्याने सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं.

यानंतर येते ती व्यक्ती म्हणजेचं अनुष्का शर्मा. विराटच्या पत्नी असलेल्या अनुष्काच्या बाबतीत म्हणालं तर तिलादेखील अनेक ब्रॅण्डेड आणि महागड्या कपड्यांची हौस आहेच. विराट अनुष्का यांच्या लग्नात अनुष्काने जो अंगावर लग्नाचा स्पेशल लेहंगा परिधान केला होता त्याकरता तिने 30 लाखांपेक्षा अधिक पैसा खर्चा केला होता. मुळात तिच्या या लुक्सची नंतर अनेक सेलीब्रेटींनी कॉपी करण्याचाही प्रयत्न केलेला पहायला मिळतो.

शिल्पा शेट्टी हिनेदेखील आपल्या लग्नात अंगावर भरजरी कपडा परिधान केला होता. शिल्पा शेट्टी साडीमधे अगदीच निराळी आणि भन्नाट दिसते हे आपल्याला माहीतच आहे. स्पेशली लग्नाकरता डिझाईन करवून घेतलेली लाल रंगाची भरजरी काठ असलेली साडी जेव्हा शिल्पाने तिच्या लग्नात परिधान केली तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर अक्षरशः खिळून राहिल्या होत्या. शिल्पाच्या साडीची किंमत 50 लाखांच्या घरात आहे, हे विशेष म्हणावं लागेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!