अजय देवगण म्हटलं की आता सर्वप्रथम नजरेत भरते ती म्हणजे सिंघम ही इमेज. अजय देवगण तसं पाहता बॉलीवुडला मिळालेला एकमेवाद्वितीय आणि गजब असा अभिनेता आहे. त्याच्याशिवाय बॉलीवुडमधील अनेक गोष्टी रखडून राहिल्या असत्या अथवा अपूर्णच राहिल्या असत्या असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही.

मुळातच बॉलीवुडचा हा सिंघम आजवर काही एका ठराविक विशिष्ट साच्याच्या भुमिकेत अडकून पडलेला आपल्याला पहायला मिळाला नाही. तो नवनवीन प्रयोग करतो, नव्यानव्या भुमिका स्वत: अदबीने स्वीकारतो. आणि योग्यरित्या हरएक भुमिकेची उभारणी करून तो आपल्या सर्व रसिकप्रेक्षकांचं मन जिंकून घेतो. मुळात हिंदी सिनेसृष्टीत अधिकाधिक श्रीमंतीची बात निघते त्यावेळी आमिर, अक्षय, सलमान या सर्वांचा उल्लेख झाल्याच आढळून येतं पण अजयचं नाव क्वचितवेळा समोर येतं.

याच कारण म्हणजे अनेकांना तर त्याच्या खास गोष्टी माहितच नाही आहेत. तुम्ही विचार करू शकणार नाही परंतु बॉलीवुडमधील अजय हा प्रायव्हेट जेटचा मालक असणारा अभिनेता आहे. “हॉकर ८००” हे त्याच्या प्रायव्हेट जेटचं मॉडेल आहे ज्याची किंमत जवळपास ८४ कोटींच्या घरात जाते. याच्याशिवाय फक्त अमिताभ, प्रियंका व अक्षय या तिघांकडेच असं स्वत:च्या मालकी हक्काचं प्रायव्हेट जेट आहे.

अनेकांना सर्वप्रथम अजयच्या संपत्तिबद्दल जेव्हा माहित पडतं तेव्हा त्यांना गजब आश्चर्य होतं. याशिवाय अजयकडे भारीतल्या गाड्या, त्याची व्हॅनिटी व्हॅन, रो हाऊस बंगला इत्यादी गोष्टीही आहेत. खऱ्या आयुष्यात तसं पाहता अजय एक रूबाबदार माणसाप्रमाणे राहणं पसंत करतो. त्याच्या अनेक सिनेमांमधूनही त्याचा असा रूबब आपण ऑनस्क्रीनही पाहत असतो.

खरतरं अजय देवगण याच्या आजवरच्या कारकिर्दीवर जर नजर टाकली तर त्याचं करियर फारस वादाच्या भोवऱ्यात कधीच सापडलं नाही. केवळ एके काळी त्याच्या आणि अभिनेत्री तब्बू या दोघांच्या अफेयर्सच्या गोष्टींनी थोडाफार मिडीया तगादा लावला होता इतकचं. बाकी अजय देवगण त्याच्या आणि काजोलच्या लग्नाबाबत नेहमी ठाम होता. आणि पुढे ही जोडी कायमची विवाहबंधनात अडकली.

अजय देवगण हिंदी सिनेसृष्टीतल्या विरू देवगण यांचा मुलगा आहे. अजयने तान्हाजी या दर्जेदार व उत्कृष्ट सिनेमामधून आपल्या अभिनयाचा शंभरावा सिनेमा पूर्ण केला. अजयने आजवर दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले आहेत. याशिवाय चार फिल्मफेयर पुरस्कारही त्याने मिळवले आहेत. याखेरीज अजय देवगण याला 2016 साली पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

अजयचा मुळ जन्म तसा दिल्लीत झाला. अजयने फुल और कांटे या सिनेमातून पदार्पण केलं होतं. आणि पदार्पणाच्याच सिनेमाला त्याला भरगोस प्रतिसाद आणि प्रेक्षकांच प्रचंड प्रेम मिळालं होतं. त्या काळी आलेल्या या सिनेमाने अक्षरश: तरूणाई व इतर रसिकप्रेक्षकांना या सिनेमाचं वेड लावून सोडलं होतं. यानंतर जिगर, संग्राम व पुढे दिलवाले हा सिनेमा.

दिलवाले या सिनेमाला कोणीही विसरू शकणार नाही इतक्या जबरदस्त प्रकारचा हा सिनेमा त्या काळात बनला होता. आणि या सिनेमाच्या एकूण एक गाण्याने, अभिनेता – अभिनेत्रीच्या अदाकारीने, सहाय्यक भुमिकांनी, नकारात्मक भुमिकांनी, जवळपास हरएक पैलूने रसिकप्रेक्षकांच्या काळजाचा ठाव चुकवला होता. अजयच्या आजवर झालेल्या यशस्वी वाटचालीत दिलवाले सिनेमाचा फार मोठा वाटा राहिला आहे, असं नक्कीच म्हणता येईल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!