सध्याच्या घडीला सिनेसृष्टीतला सर्वाधिक चर्चेत आणि आघाडीवर असलेला अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. अक्षय कुमारच्या एखाद्या सिनेमाची हिंट जरी मिळाली तरी त्याचे चाहते अगदी प्रत्येक गोष्टीकरता उत्सुक होऊन जातात. अशात काही दिवसांपूर्वीच “रामसेतु” या सिनेमाचं पोस्टर अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लॉन्च केलं होतं. आणि त्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

आता सध्याही त्याच येणाऱ्या सिनेमाबाबत चर्चा रंगली आहे. आणि या चर्चेत कारण अक्षयने शेअर केलेली एक नवी पोस्ट आहे. रामसेतु हा सिनेमा भगवान रामाने लंकेला पोहोचण्यासाठी निर्माण केलेला एक पुलाच्या कथानकावर आधारित असणार आहे. यात अक्षय कुमार नेमकी कोणती भूमिका साकारणार हे अजून स्पष्ट नाही.

अथवा सिनेमा कशा पद्धतीने बनणार आहे, याचीही कोणाला खबरबात नाही मात्र या सिनेमाची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. सोबतच अक्षय कुमार याच्यासमवेत या सिनेमात दोन अभिनेत्री दिसणार ही गोष्ट अलीकडे स्पष्ट होत आहे. कारण अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जो फोटो शेअर केला आहे त्यात दोन अभिनेत्री सिनेमाच्या स्क्रीप्ट वाचणावळी तिथे हजर असल्याचं पहायला मिळतं आहे.

यातली एक जॅकलिन फर्नांडिस तर दुसरी अभिनेत्री नुसरत भरूचा ही आहे. अक्षय आणि जॅकलिन याआधी सोबत काम करताना आपल्याला पहायला मिळाले आहेत. त्यामुळे या सिनेमात त्यांच्या भुमिका कशा वठवल्या जातील हे पाहणं रसिकप्रेक्षकांसाठी अगदीच रोचक ठरणार आहे.

अक्षय कुमार याने ज्यावेळी ही पोस्ट शेअर केली त्यावेळी त्याने म्हटलयं की, “एका चित्रपटाची टीम आधीपासूनच एकत्र कामाची सुरुवात करते, ती टीम चांगल काम करते. रामसेतु चित्रपटाच्या कथेचं वाचणं करतानाचा हा क्षण आहे. या चित्रपटाच्या शुटिंगकरता मी आता उत्सुक झालो आहे.” सोबतचं अक्षयने यात नुसरत व जॅकलिन या दोघींनाही टॅग केलेलं पहायला मिळतं आहे.

लवकरच काही दिवसांमधे अक्षय कुमार या अभिनेत्याचा “बेलबॉटम” हा सिनेमा सर्वांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अक्षय सोबत वाणी कपूर, हुमा कुरेशी, लारा आणि बरेच इतर कलाकार पहायला मिळतील. याशिवाय रोहीत शेट्टी दिग्दर्शित “सुर्यवंशी” या सिनेमाची प्रचंड आस प्रेक्षकांना लागलेली आहे, त्यामुळे हा सिनेमा लवकरात लवकर रिलीज होण्याची शक्यता अधिक वाटत आहे.

अक्षय कुमार एक न थांबणारा अभिनेता आहे असं तुम्ही म्हणू शकता. कारण “अतरंगी रे” या सिनेमालाही लवकर रिलीज करण्यात येणार आहे. अभिनेत्री नुसरत हिने तिच्या चांगल्या अभिनय कौशल्याने आजवर रसिकांची मने जिंकलीच आहेत. ड्रीमगर्ल, सोनू के टट्टू की स्वीटी, प्यार का पंचनामा असे अनेक चांगले सिनेमे आजवर तिच्या वाट्याला आले आहेत.

ती बॉलीवुडमधे एक चांगली नृत्यकलेत निपुण असलेली अभिनेत्रीदेखील आहे. दुसरीकडे आपण सर्वजण जॅकलिनच्या अभिनयाबाबत जाणतोच आहोत. जॅकलीनने आजवर केलेल्या दमदार भुमिकांनी तिने जगभरातल्या रसिकप्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. आता मुळात खऱ्या अर्थानं दोन्ही अभिनेत्री कशा पद्धतीने रामसेतु या सिनेमातील त्यांच्या वाट्याला आलेल्या भुमिकांना न्याय देतील हे पाहणं फारच महत्वाचं ठरेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!