बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिवानी आणि किशोरीताईचे कडाक्याचे झालेले भांडण अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे… पण त्यानंतर आता सगळ सुरळीत सुरु आहे… आज घरामध्ये अस काय घडलं ज्यामुळे किशोरी शहाणे यांना अश्रू अनावर झाले आणि शिवानीने किशोरीताईची माफी मागितली… शिवानीचे म्हणणे होते, तुम्ही म्हणाल्या चला आता तर मला वाटले कि तुम्ही बऱ्या आहात… तर किशोरी त्यावर म्हणाल्या “तू सारख विचारत होतीस म्हणून मी बोले”. शिवानीने सांगितली मी मज्जा करत होतेनको करू का मी तुमच्यासोबत मज्जा मी नाही करणार … किशोरीताई म्हणाल्या दिसायला खूप वाईट दिसले कारण पोट दुखत आहे… पण त्यावर शिवानीचे म्हणणे होते तुम्ही नसत म्हंटल तर मी नसत बोलेमी इतकी इनह्युमन नाहीये”…

किशोरीताईचा मूड चांगला करण्यासाठी शिवानी आज घरामध्ये बासुंदीचा बेत करणार आहे… ईतकेच नसून ती किशोरीताईना ड्राईव्हला पण ती घेऊन जाणार आहे ते पण जुहू ते मरीन ड्राईव्ह … असे तिने नेहाला सांगितले.