सिनेसृष्टीतला प्रतिभावंत कलाकरांच्या यादीत सुबोध भावे यांच आवर्जून नाव घ्याव लागत. नाटक असो, सिनेमा असो, किंवा मालिका अशा सर्वच क्षेत्रामध्ये त्यांच्या प्रतिभेची प्रचीती तमाम महाराष्ट्राला आली आहे. अशा ह्या अष्टपैलू कलाकाराचा एक नवा सिनेमा येतोय. जीवनपट आणि सुबोध भावे अस समीकरण असलेल्या सुबोध भावेंच्या नव्या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, गायक ह्या सगळ्या क्षेत्रात अभिमानास्पद कार्य केले. पण ‘आटपाडी नाईट्स’ ह्या सिनेमात अभिनयाबरोबर पहिल्यांदाच सिनेमाच्या प्रस्तुतीची जबाबदारीदेखील घेतली आहे.
मायदेश मिडीया आणि सुबोध भावे प्रस्तुत ‘आटपाडी नाईट्स’ ह्या सिनेमाचं पोस्टर सध्या लक्ष्यवेधी ठरतय. ह्या सिनेमाच्या दिग्दर्शनाची आणि लेखनाची धुरा नितीन सुपेकर यांनी सांभाळली आहे. मूळात नावाप्रमाणे हटके असणाऱ्या ह्या सिनेमाचे पोस्टर देखील आगळवेगळ आहे. नेमक ‘आटपाडी नाईट्स’ ह्या सिनेमाच्या पोस्टरमध्ये आहे तरी काय?
हे आहे ‘आटपाडी नाईट्स’ सिनेमाचे पोस्टर. पाहिलं नसेल तर निट पहा. आहे की नाही लक्ष्यवेधी? आता पाहूयात नेमक हे पोस्टर बोलक आणि आकर्षक का आहे.
दगडी आवरणाची बॉर्डर असलेला गावाकडील एका मोठ्या वाड्याचा मजबूत असा हिरव्या रंगाचा दरवाजा दिसत आहे. दगडी आवरणाच्या बॉर्डरवर मायदेश मिडीया आणि त्या खाली ‘शुभ विवाह’ अस लिहिलेलं आहे. रंगीबेरंगी नक्षीदार अस तोरण लावलेलं दिसत आहे. त्याखाली मायदेश मिडीया आणि सुबोध भावे प्रस्तुत अस लिहिलेलं दिसत आहे. त्याखाली सर्वात मोठ्या अक्षरात आकर्षक अस सिनेमाचं टायटल ‘आटपाडी नाईट्स’ दिसेल. बारकाईने बघता पोस्टरवर एका गोष्टीकडे नजर खिळून राहते टी म्हणजे कुलुपाच्या जागी ‘DO NOT DISTURB’ अस लिहिलेलं दिसत आहे. त्याखाली लेखक दिग्दर्शकाचं पूर्ण नाव. आणि त्याखाली सिनेमाचं रिलीज डेट २७ डिसेंबर २०१९ अस दिसत आहे. या रंगीत नक्षीदार पोस्टरवर उधळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या मात्र सिनेमाच्या पुसटशा कल्पनेचा गंध दरवळवतो.
‘DO NOT DISTURB’, ‘शुभ विवाह’ लावलेलं तोरण, आणि सिनेमाचं टायटल ह्या सगळ्या गोष्टी पाहता सिनेमा नवविवाहित जोडप्याच्या स्पेशल नाईटवर किंवा नाजूक विषयावर आधारित असेल असा अंदाज नक्कीच लावता येतो.
सिनेमा विनोदी असण्याची शक्यता आहे. एकंदरीत सिनेमातून मनोरंजनासोबत कोणता संदेश असेल, सिनेमात मुख्य भूमिकेत कोण असेल हे लवकरच कळेल.
मंडळी, सिनेमाचा पोस्टर कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा…