महाराष्ट्रात: ना’र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी – NCB ) मुंबईत एका क्रूझवर छा’पा टाकून 10 जणांना अ’ट’क केली आहे. एका मोठ्या बॉलिवूड स्टारचा मुलगाही यात सहभागी असल्याचे वृत्त आहे.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या या क्रूझवर रे’व्ह पार्टी होत होती. एनसीबीने गुपचूप या पार्टीत सहभाग नोंदवून आरोपींना रंगेहाथ पकडले आहे. एनसीबीला या छाप्यात मोठ्या प्रमाणात च’रस, को’केन आणि एम’डी हे ड्र’ग्स जन्य पदार्थ सापडले आहेत. पकडलेल्या सर्वांना आज रविवारी मुंबईत आणले जाणार आहे.
NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या टीम मे केली का’र’वाई… NCB मुंबई झोनल डायरेक्टर अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितले की, ‘आम्ही काही लोकांना ताब्यात घेतले आहे. तपास सुरू आहे. तसेच, अनेक प्रकारचे ड्र’ग्स औ’ष’धे जप्त करण्यात आली आहेत.
यासोबतच अ’ट’क केलेल्या आठ ते दहा लोकांची आम्ही चाचणी घेत आहोत. जेव्हा वानखेडे यांना विचारण्यात आले की पार्टीमध्ये कोणी सेलिब्रिटी उपस्थित होते का? तर ते म्हणाला ‘मी त्यावर भाष्य करू शकत नाही.’
NCB च्या आजच्या या कारवाईच्या दोन दिवस आधी म्हणजे, शुक्रवारी पाच कोटी ए’फे’ड्रिन हे ड्र’ग्स पकडले गेले आहे. एनसीबीने एका रॅ’के’टचा प’र्दा’फाश केला आणि सुमारे पाच कोटी रुपयांची इफेड्रिन औषधे जप्त केली.
हे रॅकेट ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये गाद्यांमध्ये लपवून औ’ष’धे पाठवत असे. हैदराबादहून आलेले गाद्यांचे पॅक मुंबई विमानतळावरून ऑस्ट्रेलियात पाठवायचे होते, परंतु एनसीबीच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली. गाद्या तपासल्या असता त्यात 4 किलो 600 ग्रॅम इ’फे’ड्रीन सापडले.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ’त्यूनंतर NCB टीमने ड्रग्स संबंधी आतापर्यंत अनेक मोठ्या स्टार्सची चौ’कशी केली आहे. यामध्ये अभिनेता अर्जुन रामपाल, अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर या नावांचा समावेश आहे.