Archi Parashya Wax sculptures At Lonavala Museaum

आता ‘सैराट’ या नावाचा उच्चार करण्यात आला आहे म्हणजे प्रेक्षकांना कल्पना आली असेल बहुदा की बातमी सैराटशी संबंधित आहे. होय! बरोबर ओळखलंत तुम्ही.

 

सिनेसृष्टीतील कलाकारांच्या फॅन्सविषयी काही वेगळं सांगायची गरज नाही.  प्रत्येक सिनेरसिक हा त्याच्या-त्याच्या परिने त्याच्या आवडत्या कलाकारांविषयी प्रेम, आदर व्यक्त करत असतो.  कलाकारांच्या फॅन्सना कलाकारांविषयी नेहमी काहीतरी वेगळे पाहावेसे वाटते. म्हणून आज आम्ही तुम्हांला एक खास बातमी सांगणार आहे, जी तुम्हांला आवडेल आणि बातमी वाचून वाचक नक्की ‘सैराट’ होतील.

 
लोणावळा येथील सुनिल सेलिब्रिटी वॅक्स म्युझियममध्ये परश्या आणि आर्ची यांचे पुतळे तयार करण्यात येणार आहे. या अगोदर येथे सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचे, अभिनेत्यांचे आणि क्रांतीकारकांचे पुतळे तयार करण्यात आले आहेत. आता सैराटच्या जोडीचा पुतळा बनवण्यात येणार आहे. मग आहे की नाही ही खुशखबर!

सैराटच्या जोडीसह दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा पण पुतळा तयार करण्यात येणार आहे. यासाठी या तिघांचेही मोजमाप सुनील कंडलूर यांनी घेतले आहे. लवकरच या कलाकारांचे आकर्षक पुतळे एकदा तयार झाले की प्रेक्षकांना संग्रहालयामध्ये पाहायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here