मोगैंबो खुश हुआ! 1987 मध्ये आलेला अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील तो डायलॉग आज देखील लहान मुलांपासून थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मुखी आहे. चित्रपटात जेव्हा मोगाम्बो बनलेले अमरीश पुरी ‘मोगैंबो खुश हुआ’ म्हणायचे, तेव्हा हेच विचार करून मनात घाबराहत व्हायची कि हा खलनायक आता काय पॉल उचलणार आहे.
निर्माता बोनी कपूर आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या या सुपरहिट चित्रपटाने अमरीश पुरी यांना चित्रपटसृष्टीत सुप्रसिद्ध खलनायक म्हणून स्थापित केले.
दमदार आवाज आणि डोळ्यात निखारा असा लूक असलेले हे पात्र अभिनेता अमरीश पुरी यांनी वठविलं होतं. विशेष म्हणजे त्यांच्या अभिनयामुळे ही भूमिका खऱ्या अर्थाने जिवंत झाली आणि त्यांच्या अभिनयातील एक वेगळी छाप प्रेक्षकांना पाहता आली.
आता कल्पना करा की अमरीश पुरीऐवजी कोणी दुसऱ्याने ही भूमिका केली असती तर काय झालं असतं? या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या जवळपास 31वर्षानंतर, मोगॅम्बोच्या व्यक्तिरेखेसाठी अमरीश पुरी नव्हे तर अनुपम खेर पहिली पसंती होती हे समोर आले आहे.
अनुपम खेर यांनी सांगितले की 1987 च्या ‘मिस्टर इंडिया’ या हिट चित्रपटाशी संबंधित एक रंजक किस्सा आहे. या चित्रपटातील मोगाम्बोच्या व्यक्तिरेखेस अमरत्व देणाऱ्या अमरीश पुरी यांच्या आधी ही भूमिका त्यांना मिळाली होती.
अनुपम खेर यांनी सांगितले की मोगॅम्बोची व्यक्तिरेखा त्यांना सर्वप्रथम ऑफर केली गेली होती परंतु काही महिन्यांनंतर अमरीश पुरी यांना या भूमिकेसाठी घेण्यात आले. सुरुवातीला ही गोष्ट थोडी विचित्र वाटली होती, पण जेव्हा त्यांना या भूमिकेत अमरीश पुरी दिसले तेव्हा त्यांना समजले की या भूमिकेसाठी अमरीश पुरी ही व्यक्ती सर्वात चांगली निवड आहे.
अमरीश पुरी आणि अनुपम खेर यांनी ‘त्रिदेव’, ‘राम लखन’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ सारख्या हिट चित्रपटात एकत्र काम केले होते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.