विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचे “छपाक” चित्रपटाला नकार देण्याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? सध्या चित्रपट गृहात प्रचंड गर्दी ओढून घेणारा चित्रपट म्हणजे “छपाक” हा एकमेव होय. या सिनेमाने पहिल्याच दिवशी तिकीटांची जोरदार विक्री करत प्रेक्षकांना आपल्या पर्यंत खेचून घेण्यात आणि एक सामाजिक संदेश देण्यात यशस्वी ठरत आहे.

छपाक चित्रपटाची कहाणी कोण्या ऍक्शन सिक्वेंन्स दाखवणाऱ्या ऍक्शन सिनेमाची नसून एक सामान्य आयुष्य जगणाऱ्या युवतीची आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून बाॅक्स ऑफीसवर बक्कळ कमाई करण्याचा उद्देश नसून निव्वळ एक सामाजिक संदेश देण्याचा हेतू होता. तो यशस्वी रित्या पार पडत देखील आहे.

अभिनेत्री दिपीका पादूकोनचे या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वत्र कौतूकही होत आहे. परंतू हा चित्रपट पडद्यावर येण्याआधी बाॅलीवूडच्या अनेक अभिनेत्रींनी नकार दर्शवला त्यानंतर हा मोलाचा वाटा दिपीकाच्या पदरी आला.

चित्रपट चर्चेत असतानाचा यावर स्क्रिप्ट चोरीचा आरोप एका लेखकाने केला होता. त्यामुळे अनेक अभिनेत्रींनी माघार घेतले होते. प्रियांका चोप्रा, कंगना रानावत तसेच अनुष्का शर्माने देखील बिझी शेड्यूल मुळे नकार दिला होता. परंतू ऐश्वर्या राय बच्चनला निर्मात्यांने विचारले असता तिचे उत्तर जाणून धक्का बसण्या सारखेच आहे.

ऐश्वर्या राय बच्चनला संपूर्ण जगभर विश्वसुंदरी म्हणून एक वेगळे नाव आहे. तसेच फोब्जच्या मॅगझिन मध्ये अनेक वर्ष चर्चेत राहिलेली अभिनेत्री देखील. म्हणून ऐश्वर्या राय बच्चनला या चित्रपटाच्या माध्यमातून कुरूप दिसायचे नव्हते. तिची प्रतिमा प्रेक्षकांच्या नजरेत वेगळी दिसेल म्हणून तिने हातातला घास गमावला.

दिपीकाने निभावलेली भुमीकेचे जेवढे कौतूक करावे तेवढे कमीच आहे. कारण हाॅलीवूड अर्थात इंग्रजी चित्रपटात नामवंत अभिनेत्रीच्या यादीत असताना देखील तिने त्यातून वेळ काढत खास वेळ “छपाक”ला देणे कौतुकास्पद आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून एॅसिड हल्यात पिडीत असलेल्या तरूणींच्या कहाणीचा एक वेगळ्या धाटणीच्या कहाणीला प्रेक्षक वर्ग दाद देतोय हे देखील तेवढेच महत्वाचे आहे आणि एॅसिड हल्ला करून अनेक मुलींचे जिवन बरबाद करणाय्रांना तिने “छपाक” लगावले आहे

दिपीका पादूकोणला पुढील वाटचालीस स्टारमराठीकडून शुभेच्छा!