मित्रांनो!, अमिताभ बच्चन!!! हे नाव आणि त्याभोवतली असणारे प्रसिद्धीचे वलय किती मोठे आहे, हे आपण सर्वजण चांगलेच जाणून आहोत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे पूर्वीपासूनच लक्झरी कारचे शौकिन आहेत. त्यांच्याकडे काही लाखों तर काही अगदी करोडोंच्या सुद्धा अनेक आलिशान गाड्या आहेत. त्यांच्या गॅरेजमध्ये ऑडी, मर्सिडीज लेक्सरपासून ते अनेक महागड्या गाड्यांचा ताफा आहे. आज आपण या बच्चन फॅमिलीकडे असणाऱ्या महागड्या गाड्यांचे कलेक्शन आणि त्यांच्या किमती जाणून घेणार आहोत….
अमिताभ बच्चन यांच्याकडे असलेला कार कलेक्शनमधील ही सर्वात महागडी कार आहे. बेंटली कन्टिनेंटल जीटी लक्झरी कारची भारतामध्ये किंमत 3 कोटी 30 लाख ते 4 कोटी रुपयांपर्यंत आहे. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त 3 मिनिटं 7 सेकंदात ती 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेगाने धावते. या कराची टॉप स्पीड 329 किलोमीटर प्रतीतास आहे.
बच्चन परिवाराकडे जवळपास 3 कोटींची रेंज रोव्हर कार आहे. त्यांनी ही कार 2016 मध्ये खरेदी केली होती. नुकताच ही कार अभिनेता विकी कौशलने खरेदी केली आहे.
बच्चन परिवाराच्या गॅरेजमध्ये अनेक ब्रँडेड कार आहेत. यामधील एक मर्सिडीज बेंझ एस टॉप मॉडल कार आहे. मर्सिडीजची ही कार मर्सिडीज बेंझ एस-क्लासची टॉप व्हेरिएंट आहे. या 5 सीटर कारची किंमत सुमारे 1 कोटी 50 लाख रुपये आहे. इतकेच नाही तर अमिताभ बच्चन यांच्याकडे आणखीही अनेक एस क्लास गाड्या आहेत.
बच्चन परिवाराकडे असलेल्या पोर्श केमन एस वाहनाची किंमत सुमारे 95 लाख रुपये आहे. ही अमिताभ बच्चन यांची पहिली टू सीटर कार आहे. ही एक अतिशय स्टाईलिश आणि लक्झरी कार आहे.
मुंबईच्या रहदारीपासून बचाव करण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्याकडे एक छोटी कार देखील आहे. 2012 मध्ये अभिनेता अभिषेक बच्चनने आपल्या वडिलांना मिनी कूपर एस कार गिफ्ट दिली होती. या कारची किंमत 35 लाख रुपये आहे.
अमिताभ बच्चन यांच्या गाड्यांच्या लिस्टमध्ये टोयोटा कंपनीची टोयोटा लँड क्रुझर कारचाही समावेश आहे. या कारची किंमत दीड कोटी रुपये आहे. एकेकाळी ही अमिताभ बच्चन यांची सर्वात आवडती कार होती.
सुमारे 2 कोटी 30 लाख रुपयांची ही कार बच्चन परिवाराच्या गॅरेजचे सौंदर्य आणखी वाढवते. लेक्सस एलएक्स 570 या कारमध्ये अशी वैशिष्ट्य आहेत ज्याबद्दल कोणी विचारच करु शकत नाही. अमिताभ बच्चन यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची रॉल्स रॉयस फँटम कार आहे. ही कार त्यांना चित्रपट निर्माते विधु विनोद चोप्रा यांनी गिफ्टमध्ये दिलेली. त्यांनी ही कार एका व्यावसायिकाला विकाली असल्याचे वृत्त आहे. अमिताभ बच्चन यांच्याकडे असलेल्या गाड्यांची चर्चा करताना ऑडीचे नाव नसेल असं होणार नाही. Audi A8L लक्झरी सेडान कार अभिषेक बच्चन याच्याकडे असते. या कारची किंमत तब्बल 1 कोटी 50 लाख रुपये आहे.