आमीर खानला इश्काची इंगळी डसली, पिंजरा पाहण्यासाठी उत्सुक

pinjra amir khan

 

दिग्दर्शक व्ही शांताराम यांची एक उत्कृष्ट कलाकृती असलेला पिंजरा नव्यानं प्रदर्शित झाला आहे. याबाबत अभिनेता आमीर खाननं ट्विट करुन आनंद व्यक्त केला आहे. तसंच  हा सिनेमा पाहणार असल्याचं आमीरने म्हटलं आहे.

 

“व्ही शांताराम यांची शेवटची कलाकृती म्हणजे पिंजरा सिनेमा पुन्हा प्रदर्शित झाल्याचं समजलं. व्ही शांताराम यांच्यासारख्या महान दिग्दर्शकाची कलाकृती पाहण्याची संधी वारंवार येत नाही. ही संधी मी सोडणार नाही, पण तुम्हीही सोडू नका” असं ट्विट आमीरने केलं आहे.

अभिनेते श्रीराम लागू आणि संध्या यांचा अभिनय, राम कदम यांचं संगीत आणि दमदार लावणीच्या नृत्यानं रंगतदार ठरलेला हा सिनेमा आजही रसिकांच्या मनाला भुरळ घालत आहे.  १८ मार्च रोजी हा सिनेमा पुन्हा एकदा डॉल्बी साऊंडसह प्रदर्शित करण्यात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here