राहुल महाजन लवकरच बोहल्यावर, कोल्हापूरच्या अमृतासोबत लगीनगाठ

rahul amruta

 

नेहमीच वादात असणारा राहुल महाजन तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. मूळची कोल्हापूरची असलेली मॉडेल अमृता मानेसोबत राहुल विवाहबंधनात अडकणार आहे.

 

राहुलचं हे तिसरं लग्न असेल. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर एका टीव्ही चॅनलवरील रिअॅलिटी शोमध्ये राहुलने स्वत:चं स्वयंवर रचलं. यामध्ये 16 तरुणींमधून त्याने डिंपी गांगुलीची पत्नी म्हणून निवड केली होती. 6 मार्च 2010 रोजी दोघं विवाहबंधनात अडकले होते.

 

लग्नानंतर केवळ चार महिन्यांतच राहुलने मारहाण केल्याची तक्रार डिंपीने केली होती. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला आणि राहुलच्या आयुष्यात मॉडेल अमृता माने आली. आता लवकरच हे दोघे लगीनगाठ बांधणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here