बॉलिवुड असो वा मराठी सिनेसृष्टी, सिनेसृष्टीचं एक विदारक सत्य कधीकधी म्हटलं तर ते का’स्टीं’ग का’ऊ’च. दरवेळी ते चुकीच अथवा गलिच्छच आहे असं नाही पण काही वेळा या गोष्टी चुकीच्या लोकांच्या हातात गेल्याने तिथे वाईट प्रवृत्ती पहायला मिळते. कलाकारांच्या वाट्याला अनेकदा अनेक विदारक आणि त्रासदायक गोष्टी येत असतात. त्यापैकी सर्वाधिक गंभीर बाब म्हटलं तर ती, कलाकाराला स्वत:च्या देहाशी प्रतारणा करावी लागणं.

अर्थात ज्याला ह’ल्ली कॉम्प्रमाईज हा शब्द सर्रास वापरला जातो. कलाकारांना जर ब्रेक हवा असेल तर त्यांना या गोष्टीचा अनेकदा सामना करावा लागतो. अनेक कलाकारांनी यावर उघडपणे भाष्य केलेली पहायला मिळतात. आणि आता ईशा अग्रवाल या अभिनेत्रीनेदेखील ही बाब प्रकाशझोतात आणलेली पहायला मिळते आहे. तिने नुकतचं एका पोर्टलसाठी मुलाखत दिली, आणि तिच्या मुलाखतीत तिचा वैयक्तिक अनुभव सांगत या मुद्यावर प्रकाश टाकला.

तिच्यासाठी कलाकार होण्याचा प्रवास तितकासा नक्कीच सोपा नव्हता कारण लातुरसारख्या छोट्या ठिकाणाहून अभिनय क्षेत्राची मुंबई गाठणं फार कठीण आहे. स्वत:च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आई-वडीलांना समजावून मुंबईत आलेली ईशा अनेक ठिकाणी ऑडिशन साठी जाऊ लागली होती. याचदरम्यान एका का’स्टीं’ग काऊचच्या माणसासोबत तिची ओळख झाली, तो व्यक्ती दिग्दर्शकदेखील होता.

ईशाला प्रथम भेटीत त्याने त्याच्या अनेक केलेल्या कामांची अवाजवी माहितीदेखील दिली, आणि वारंवार तिला तुलाही चांगलीच भुमिका देईल असं सांगू लागला. ईशा त्याच्या बोलण्याच्या शब्दांमधून आणि वर्तणातून थोडीशी अधीर नक्कीच झाली होती. पण मुळात ती तिथे तिच्या बहिणीलादेखील सोबत घेऊन गेल्याने तिच्यात धीर होता.

ईशा अग्रवाल पुढे सांगताना म्हणाली की, त्या व्यक्तीने मला ऑडिशननंतर थेट कपडे काढायला सांगितले, ते शब्द ऐकून ती जाग्यावरच थोडीशी चकीत झाली होती. पुढे तिला तो व्यक्ती असं म्हणाला की, मला तुझं शरीर पहायचं आहे. मी कपडे काढावेत आणि त्याने माझं शरीर पाहावं अशी त्याची मनस्वी ईच्छा होती. त्याने काहीही न विचार करता थेट अशी बोलणीही केली. ईशाला त्याच्या शब्दांनी फार धक्का बसला होता, ईशा तिथून निघून गेली.

त्यानंतर त्याने ईशाला मोबाईलवरून संपर्क करायचा अनेकदा प्रयत्न केला होता. परंतु ईशाने त्याला ब्लॉ’क करून टाकलं. ईशासाठी हा अनुभव फारच ध’क्कादायक ठरला होता. ईशा मुलाखतीत हेदेखील म्हणाली की, नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या कलाकारांनी चुकीच्या अशा लोकांच्या बळी अजीबातच पडू नये. हे क्षेत्र तुमच्या अंगभुत कलागुणांवर अवलंबून असल्यामुळे तुम्हाला आज ना उद्या संधी मिळेलच. पण त्या संधीसाठी कोणीही यासारख्या गोष्टींना बळी पडण्याची गरज नाही.

ईशाने आजवर मिस इंडिया एक्सक्वासाईट 2015, मिस इंडिया इंटरनेशनल 2017, मिस ब्युटी टॉप ऑफ वर्ल्ड 2019, असे खिताब मॉडेलिंग करत मिळवले आहेत. ईशा म्हणते की, आजवरच्या तिच्या आयुष्यात एक अभिनेत्री होण्यासाठी लारा दत्त या अभिनेत्रीने तिला कायम प्रेरणा दिली आहे. शिवाय तिला कायमच बहिण आणि आई-वडील यांचा उत्तम पाठींबा सतत मिळत राहिला आहे.

ईशाच्या आजवरच्या वाटचालीनंतर आता तिच्या आयुष्यात पुढे चांगले प्रोजेक्ट्स हाती येत असल्याचीदेखील खबर मिळाली आहे. आणि ईशा अग्रवाल तिच्या आजवरच्या प्रवासात जशी खंबीरपणे पुढे जात राहिली नाही आहे तशीच ती इथून पुढेदेखील भरारी घेईल यात काही शंकाच नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!