मित्रांनो!, तसे पाहायला गेले तर काल अभिनेता सुयश टिळक याची मैत्रीण आयुषी भावेचा वाढदिवस , पण त्याने या शुभ दिवसाचे औचित्य साधून आपल्या चाहत्यांसाठी आणि मित्रपरिवारासाठी एका मोठ्याच आनंदाच्या बातमीचा बॉम्बस्फोट केलाय… होय!!! अभिनेता सुयश टिळक याचा साखरपुडा झाला आहे.

आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्री आयुषी भावेसह त्याचा साखरपुडा झाला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास कॅप्शन देत  साखरपुडा सोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

विशेष म्हणजे आज आयुषीच्या वाढदिवसाच्याच दिवशी सुयशने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सुयश टिळकचे फोटो पाहताच चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. साखरपुडा झाला असला तरी सनई चौघडे कधी वाजणार अर्थात त्यांच्या लग्नाची तारीख काय हे अद्याप समोर आलेले नाही.

सुयश आणि आयुषी या दोघांचे फोटो खास असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघांचा हा रोमँटिक अंदाज घायाळ करणारा दिसतोय. फोटो पाहिल्यानंतर सुयश टिळकची जोडीदार आयुषी भावे नेमकी कोण आहे? याविषयी चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. आयुषी भावेसुद्धा अभिनेत्री आणि  डान्सर आहे. युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी झळकली होती.

आयुषी लवकरच “या गावाचं की त्या गावाचं” या मराठी सिनेमात झळकणार आहे. आयुषी सुद्धा इन्स्टाग्रामच्या माध्यामातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यास विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.

मंगळवारी पार पडलेल्या या साखरपुड्याच्या सोहळ्यातील आपल्या जीवनसांगिनीच्यासोबतचे काही अत्यंत सुरेख फोटोग्राफ्स त्याने आपल्या इन्स्टाग्रामवरील अकाउंटवर शेअर केले आहेत. या पोस्ट मध्ये सुयश टिळक म्हणतो आहे की, “माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सुंदर करणारी स्त्री. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्याबरोबर माझे आयुष्य संपूर्ण झाले आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझा असा एक अद्भुत आणि अद्वितीय जीवनसाथी आहे….. हे शेअर करतांना आनंद होत आहे की, आम्ही अधिकृतपणे एगेंज्ड झालेलो आहोत आणि एकत्रितपणे सहजीवनाचा नवीन प्रवास सुरू करतो.

आपल्या सर्व प्रियजनांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने…आमच्या आणि आमच्या सर्व कुटुंबियांबद्दल मित्रांनी, रसिकांनी दाखविलेल्या प्रेम आणि आपुलकीबद्दल आणि हे सुखदक्षण आमच्यासाठी खास केल्याबद्दल धन्यवाद. ” विशेष म्हणजे सायली संजीव, गौतमी देशपांडे, आदिश वैद्य, पियुष रानडे आणि इतर अनेक मराठी सेलेब्सनी कमेंट्स करून सुयश आणि आयुषी यांचे अभिनंदन केले आहे.

सुयश टिळक यांच्या कारकीर्दीबद्दल सांगायचे झाल्यास अमरप्रेम, हे बंध रेशमाचे, पुढचे पाऊल, का रे दुरवा, बापमाणूस इत्यादी टीव्ही सिरियल्स मध्ये तो झळकलाय. सध्या तो सायली संजीव सोबत शुभमंगल ऑनलाइनमध्ये दिसतो आहे. त्याने क्लासमेट, कॉफी आणि बरेच काही, हॅशटॅग प्रेम या मराठी आणि खालीपिली या हिंदी आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर आयुषी भावे ‘रूपनगर के चीते’ या नवीन मराठी चित्रपटात दिसणार आहेत. विशेष म्हणजे ती युवा डान्सिंग क्वीन डान्स-रिअॅलिटी शोचा भाग होती.

स्टार मराठी टीमतर्फे सुयश आणि आयुषीचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!!!