मित्रांनो! जेष्ठ अभिनेते प्रकाश राज म्हणजेच बॉलिवूडचे जयकांत शिक्रे हे त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. आजवर त्यांनी तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी या विविध भाषांमधील चित्रपटांत काम केले आहे. प्रकाश राज हे त्यांच्या मतांसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. प्रकाश राज यांनी ११ वर्षांपूर्वी पोनी वर्माशी लग्न गाठ बांधली होती. पोनी वर्मा ही प्रकाश राज यांच्या पेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. त्यांच्या लग्नाला काल ११ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांनी एका अनोख्या अंदाजात हा दिवस साजरा केला आहे.

प्रकाश राज यांनी पत्नी पोनी वर्माशी दुसऱ्यांदा लग्न केले आहे. या लग्नाचे कारण त्यांचा मुलगा आहे. या विषयी त्यांनी सोशल मीडिया पोस्टवर सांगितले आहे. प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्रकाश त्यांची पत्नी पोनी वर्मा आणि मुलगा दिसत आहे. यात त्या दोघांनी पुन्हा एकदा लग्न केल्याचे दिसत आहे.

एका फोटोत प्रकाश त्यांच्या पत्नीला प्रपोज करत आहेत. तर दुसऱ्या फोटोत ते किस करताना दिसत आहे. त्यानंतर एका फोटोत ते संपूर्ण कुटुंबासोबत दिसत आहेत. हे फोटो शेअर करत ‘आम्ही आज रात्री पुन्हा एकदा लग्न केले आहे…कारण आमचा मुलगा वेदांतला आमचं लग्न पाहायचं होतं,’ असे कॅप्शन प्रकाश यांनी दिले आहे.

प्रकाश यांनी वयाच्या ४५ व्या वर्षी दुसरं लग्न केलं होतं. एका कठिण प्रसंगातून जात असताना त्यांच्या आयुष्यात ३२ वर्षीय पोनीची एंट्री झाली. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यामुळे त्यांनी पोनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. पोनी सिनेक्षेत्रातच करिअर करत असून ती कोरिओग्राफर आहे. एका चित्रपटादरम्यान, प्रकाश राज आणि पोनी यांची जवळीक वाढली. या चित्रपटाच्या कोरिओग्राफीचं काम तिच्याकडे होतं.

पोनी ही प्रकाश यांच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान, तरीही ती राज यांच्या प्रेमात पडली. हळहूळ या दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं अन् आता त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनाला ११ वर्षे पूर्ण झाले आहेत. प्रकाश आणि पोनी यांनी २४ ऑगस्ट २०१० रोजी लग्न केलं. यापूर्वी १९९४ साली त्यांनी तमिळ अभिनेत्री ललिताकुमारी हिच्याशी विवाह केला होता. त्यांच्यापासून राज यांना दोन मुली व एक मुलगा आहे. राज यांचे पहिले लग्न तुटल्याने त्यांनाही अतिशय वेदना झाल्या.

सर्वकाही आनंदात सुरू असताना, त्यांच्या आयुष्यात मोठी दुर्घटना घडली. सन २००४ मध्ये त्यांच्या ५ वर्षाच्या मुलाचे निधन झालं. या घटनेनं राज आणि त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला. मेघना आणि पूजा या दोन मुलींवरही दु:खाचा डोंगर कोसळला. पतंग उडवताना वरुन पडल्याने सिद्धूचा मृत्यू झाला होता. राज यांच्या पत्नी ललिता यांना या घटनेचा मोठा धक्का बसला. त्यातूनच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या दोघांनी घटस्फोटही घेतला.

त्यानंतर, २४ ऑगस्ट २०१० या दिवशी प्रकाश यांनी दुसरं लग्न केलं. हा राज यांच्या दुसऱ्या लग्नाचा ११ वा वाढदिवस आहे. त्यामुळे, त्यांनी ट्विटरवर लग्नाचा फोटोही शेअर केला आहे. प्रकाश यांनी डार्लिंग वाईफ म्हणत पोनीला चांगली मैत्रीण, प्रेमिका, ट्रॅव्हलर आणि ती आज माझं सर्वकाही आहे, असे पोनीने म्हटलंय. प्रकाश राज यांचं कुटुंब एकत्र असून त्यांच्या मुलांसह पोनीने रक्षाबंधनाचा फॅमिली फोटो शेअर केला आहे.