सध्याच्या घडीला बॉलिवुडमधील दोन कलाकारांनी केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलं होतं असलेला पहायला मिळतो आहे. या व्हिडिओच्या निम्मिताने अनेक गोष्टींच्या चर्चांनाही उधाण आल्याच पहायला मिळालं आहे. शहबाज या कलाकाराने अभिनेत्री जॉर्जिया एंड्रीयानी जी अरबाज खान याची गर्लफ्रेंड आहे, तिच्यासोबत चक्क एका बाथटबमधे व्हिडिओ शुट करून तो सोशल मीडियावर अपलोड केल्याचं पहायला मिळतं आहे.

हा व्हिडीओ जॉर्जिया आणि शहबाज दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केल्यानंतर त्या व्हिडिओला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याच पहायला मिळतं आहे. दोघेही संपूर्ण बाथटबमधे थिरकताना या व्हिडिओमधे दिसून येत आहेत. तर या व्हिडिओमधे असलेला शहबाज हा मुळात प्रचंड प्रसिद्धी लाभलेल्या “शहनाज गिल” या अभिनेत्रीचा भाऊ आहे.

शहनाज आजवर विविध माध्यमांतून प्रसिद्ध झालेली आपल्याला पहायला मिळतेच शिवाय आता तिचा भाऊदेखील चांगलाच प्रसिद्धीझोतात येत असल्याची चाहूल हळूवार मिळू लागली आहे. अभिनेत्री शहनाज गिल हिने बिग बॉसच्या 13 व्या पर्वात चांगलच नाव कमावलं. तिचा चाहतावर्ग याच दरम्यान अधिक वाढला आणि तिच्या चाहत्यावर्गाने नेहमीच तिचं कौतुकही केलं.

या दरम्यान बिग बॉसच्या पर्वात तिचा भाऊ शहबाजदेखील थोड्या वेळासाठी झळकला होता, तो आपल्या बहिणीला आधार द्यायला कार्यक्रमात हजर राहिल्याचं समजतं होतं. आणि सध्याच्या घडीला शहनाजचा हा भाऊ तर दुसरीकडे अरबाज खान याची गर्लफ्रेंड असलेली जॉर्जिया सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असल्याच पहायला मिळतं आहे.

शहबाजही आजच्या घडीला हळूहळू एकेक यशाची पायरी चढताना पहायला मिळतं आहे. त्याचे एकेक म्युझिक व्हिडिओज हळूहळू रिलीज होताना पहायला मिळत आहेत. यासोबत त्याला नुकतचं काही चित्रपटांच्या ऑफर्सही आल्याचं समजतं आहे. आणि मुळात अनेकांना एक प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे, चक्क अरबाज खान याची गर्लफ्रेंड आणि शहबाज यांनी कोणत्या खास कारणास्तव नेमका हा नवा व्हिडिओ बनवला असेल?

तर मुळात मुद्दा असा आहे की, जॉर्जिया एंड्रीयानी आणि शहबाज हे दोघेही लवकरच एका प्रोजेक्टकरता एकत्र झळकणार असल्याचं पहायला मिळणार आहे. हे दोघेही लवकरचं एका नव्या म्युझिक व्हिडिओमधे फिचर होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

तुर्तास त्यांनी जो डान्स केला आहे, त्याची बात म्हणालं तर बाथटबमधे वेगवेगळ्या छटा बदलत “टैंपरेचर” या गाण्यावर ते दोघेही थिरकताना पहायला मिळाले आहेत. जॉर्जियाचं सिनेसृष्टीत पदार्पण अगोदरचं झालेल आहे. तिने दाक्षिणात्य सिनेमा कैरोलाइन आणि कामाक्षी यांमधून तिच्या कामाची छाप उमटवली आहे. आता ती लवकरचं बॉलीवुडमधील “वेलकम टू बजरंगपूर” मधेही पहायला मिळणार आहे.

सध्याच्या घडीला इन्स्टाग्राम वरील व्हिडिओजच्या माध्यमातून आज अनेक कलाकारांना त्यांचे कलागुण जगासमोर दाखवायची संधी मिळत असल्याच आपण पाहतो आहोत. अनेक सेलीब्रेटी कलाकार या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठीच्या ताकदीचा चांगल्या पद्धतीने वापर करून घेत आहेत, हे आपण सहजरित्या पाहूच शकतो. अरबाज याची गर्लफ्रेंड असलेल्या जॉर्जियाला तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक चाहते फॉलो करतात, अनेकांना तिचे डान्स व्हिडिओज नेहमीच आवडतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!